सतत वात्सल्यभावात असणार्‍या तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान !

पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये

रत्नागिरी, २० मे (वार्ता.) – वैशाख कृष्ण पक्ष द्वितीया (२० मे २०१९) या दिवशी शहरातील टी.आर्.पी. येथील अंबर सभागृहात साधकांना व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करतांना सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम यांनी मूळच्या देवरुख येथील आणि आता तपोधाम येथे सेवारत, तसेच सतत वात्सल्यभावात असणार्‍या श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) या सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली. या आनंदवार्तेने सर्व साधकांना भावाश्रू अनावर झाले. सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांनी पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांचा पुष्पहार घालून आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.

(याविषयीचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करीत आहोत.)


Multi Language |Offline reading | PDF