दाहोड (गुजरात) येथे पाणी वाया घालवणार्‍यांना २५० ते ५०० रुपये दंड !

देशात सर्वच ठिकाणी असा दंड लावला, तरच जनतेला पाणी वाचवण्याची शिस्त लागेल !

वडोदरा (गुजरात) –  देशभरात पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणी पाणी वाया घालवत असल्याचे आढळल्यास त्याला दंड ठोठावण्याचा निर्णय गुजरातमधील दाहोड शहर पालिकेने घेतला आहे. दाहोड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कडणा धरण आणि पाटा डुंगरी तलाव यांची जलपातळी पुष्कळ खालावली आहे. तीव्र पाणीटंचाई असल्याने पाणी वाया घालवणार्‍यांना सध्या २५० रुपये ते ५०० रुपये दंड आकारला जातो, असे पाणीपुरवठा समितीचे प्रमुख लखन राजगोर म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF