राष्ट्रहिताच्या आड आल्यास इराणला नष्ट करू ! – अमेरिकेची धमकी

गेली ३ दशके पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी भारताच्या सुरक्षेस बाधा ठरत आहेत. असे असतांना भारताने कधी पाकला अशी धमकी दिली आहे का ?

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्रहिताच्या आड आल्यास इराणला नष्ट करू, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे इराणला दिली आहे. ‘इराणला लढायचे असेल, तर तो त्याचा अंत असेल. पुन्हा अमेरिकेला धमकी देण्याचे धाडस करू नका’, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

१. अमेरिकेने आखाताच्या समुद्रात त्याच्या युद्धनौका आणि बी-५२ बॉम्बर विमाने तैनात केली आहेत. इराणचे समर्थन असलेल्या सशस्त्र इराकी गटांकडून धोका असल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेच्या अतिरिक्त राजनैतिक कर्मचारी वर्गाला इराक सोडण्यास सांगितले आहे.

२. १९ मे या दिवशी अज्ञातांकडून इराणची राजधानी बगदादच्या ग्रीन झोन हाऊसिंगमधील सरकारी कार्यालये आणि दूतावास यांवर रॉकेट डागण्यात आले. यात अमेरिकेच्या दूतावासाचाही समावेश होता. या आक्रमणामागे कोण आहे, ते अजून स्पष्ट झालेले नाही.

३. मागच्या आठवड्यात संयुक्त अरब अमिरातीच्या समुद्री क्षेत्रात सौदी अरेबियाच्या २ तेल टँकरवर घातपाताच्या उद्देशाने आक्रमण करण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF