ताझिकिस्तानमधील कारागृहामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ३२ जणांची हत्या, तर कारवाईत २४ आतंकवादी ठार

आतंकवाद्यांना कारागृहात पोसण्यापेक्षा त्यांना तात्काळ फाशी देणे का आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !

नवी देहली – ताझिकिस्तानची राजधानी दुशांबे येथील एका कारागृहामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी चाकूद्वारे ३२ जणांची हत्या केली. यात २९ बंदीवान आणि ३ सुरक्षारक्षक यांचा समावेश आहे. या कारागृहामध्ये दीड सहस्र बंदीवानांना ठेवण्यात आले आहे. आतंकवाद्यांच्या विरोधात या वेळी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये २४ आतंकवादी ठार झाले. आक्रमण करणारे आतंकवादी इस्लामिक स्टेटचे आतंकवादी होते.


Multi Language |Offline reading | PDF