वर्ष २०१२ च्या पुणे बॉम्बस्फोटांतील आरोपी अस्लम शब्बीर शेख मुंबई पोलिसांना शरण

जामीन देतांना न्यायालयाने घातलेल्या अटींचा शेख यांच्याकडून भंग

  • धर्मांध आतंकवाद्यांचे खरे स्वरूप जाणा !
  • न्यायालयाने जामीन घातलेल्या अटी धुडकावून लावणार्‍यांविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे काय म्हणणे आहे ?
  • बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार आणि जिहादी आतंकवाद्यांना शिक्षा कधी होणार ? कूर्मगतीने चालणारी अन्वेषण आणि न्याय यंत्रणा लोकशाहीची निरर्थकताच अधोरेखित करतात.
जंगली महाराज रस्त्यावरील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अस्लम शब्बीर शेख उपाख्य बंटी जहागिरदार

श्रीरामपूर (जिल्हा नगर) – वर्ष २०१२ मध्ये इंडियन मुजाहिदिनचा आतंकवादी यासिन भटकळ याने जंगली महाराज रस्त्यावर ४ ठिकाणी बॉम्बस्फोट केले होते. या प्रकरणातील आरोपी अस्लम शब्बीर शेख उपाख्य बंटी जहागिरदार याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने नाकारला. त्यानंतर त्याने आतंकवादविरोधी पथकाच्या मुंबई पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इरफान लांडगे याला शेख याने हत्यारे पुरवल्याचा आरोप आहे. जामीन नाकारतांना न्यायालयाने १६ मेपर्यंत आतंकवादविरोधी पथकासमोर उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता. सध्या अस्लम शेख याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला असून त्याची रवानगी आर्थररोड कारागृहात करण्यात आली आहे.

यापूर्वी आतंकवादविरोधी पथकाने अस्लम शेख याला २ वेळा अटक केली होती. न्यायालयाने काही अटींवर त्याचा जामीन संमत केला होता; पण जामिनावर बाहेर असतांना शेख आतंकवादविरोधी पथकाच्या पोलीस ठाण्यात उपस्थित रहात नव्हता. त्याच्या विरोधात या काळात काही गुन्हेही नोंदवले गेले. त्यामुळे न्यायालयाने शेख याचा जामीन रहित करण्याचा आदेश केला. महापालिकेच्या वर्ष २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेख याची आई रजियाबी जहागीरदार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवून निवडून आल्या होत्या. काही मासांपूर्वी त्यांचे निधन झाले. (बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असणार्‍या व्यक्तीच्या आईला ‘उमेदवार’ म्हणून उभी करणारी राष्ट्रवादी काँग्रेस कशा वृत्तीच्या व्यक्ती जनतेवर थोपवू पहात आहे, हे लक्षात घ्या. – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF