अमेरिका आणि इराण यांच्यामधील वाढता तणाव युद्धाच्या दिशेने

नवी देहली – अमेरिका आणि इराण यांच्यामधील तणाव युद्धाच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे. अमेरिकेकडून मध्य-पूर्वेमध्ये केल्या जाणार्‍या सैनिकी सिद्धतेवरून असा अनुमान काढण्यात येत आहे. अमेरिकेच्या या कृतीमुळे काही देश घाबरले आहेत, तर काहींनी नापसंती व्यक्त केली आहे. युरोपमधील मित्र राष्ट्रांपैकी एक असणार्‍या स्पेनने त्याच्या युद्धनौकांना अमेरिकेच्या नौदलाच्या पथकामध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. अमेरिकेने युद्ध छेडलेच तर त्याचा परिणाम भारतावरही होणार आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन देशातील इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.


Multi Language |Offline reading | PDF