५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मिरज येथील कु. कृष्ण राघवेंद्र आचार्य (वय १० वर्षे) याची त्याच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील  कु. कृष्ण राघवेंद्र आचार्य एक आहे !

(‘कु. कृष्ण राघवेंद्र आचार्य (वय १० वर्षें) याची वर्ष २०१६ मध्ये ५३ टक्के पातळी होती.’ – संकलक)

कु. कृष्ण आचार्य

१. गुणवैशिष्ट्ये

अ. ‘कु. कृष्ण नेहमी आज्ञापालन करतो. तो नेहमी दुसर्‍यांना साहाय्य करतो. दुसर्‍यांकडून चुका होऊ नयेत; म्हणून तो त्यांची काळजी घेतो.

आ. तो शिस्तप्रिय आहे. त्याचे नीटनेटकेपणा आणि शिस्त यांकडे सतत लक्ष असते. तो इतरांनाही त्याची जाणीव करून देतो.

इ. एकदा ‘रामायणा’ची ध्वनीचित्रफीत (सीडी) पाहिल्यावर कु. कृष्णाने त्याचा मोठा भाऊ राम याचे पाय दाबून दिले. त्या वेळी ‘मी श्रीरामाची सेवा करत आहे’, असा त्याने भाव ठेवला.

ई. नामजप करतांना त्याचे ध्यान लागते.

उ. कृष्णाने एकदा शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळी श्रीकृष्णाचा वेश परिधान करून गीतेतील श्‍लोक म्हणण्याच्या प्रतियोगितेत प्रथम क्रमांक मिळवला.

ऊ. एक दिवस कृष्णाच्या वर्गातील विद्यार्थ्याने त्याच्या बाबांना सांगितले, ‘‘कृष्णाच्या डोक्यावर मोरपीस असल्यासारखे दिसत आहे.’’ बाबांनी त्याच्याकडे बघितल्यावर त्यांनाही तसेच दिसले.

२. स्वभावदोष

चिडचिड करणे

– सौ. जयश्री राघवेंद्र आचार्य ( कु. कृष्ण याची आई), मिरज, जि. सांगली. (१.१२.२०१८)

परात्पर गुरुदेवांची ‘रसमय’ वाणी !

‘परम पूज्यांच्या बोलण्यात साखरेचा ‘गोडपणा’ असतो.

त्यांच्या बोलण्यात काकडीचा ‘थंडपणा’ जाणवतो.

त्यात टोमॅटो सारखा ‘रसाळपणा’ (रसाळदार) असतो

आणि कारल्याचा ‘कडू (कटू) सत्यपणाही’ असतो.

हे सारे असते आमच्या प्रगतीसाठीच ! त्यामुळे त्यांचे बोलणे अजून अजून (सारखे) ऐकावेसे वाटते. ते ऐकल्याने मन शांत होते आणि प्रेमाने भरून जाते.’

– कु. कृष्ण राघवेंद्र आचार्य (वय १० वर्षे), मिरज, सांगली.

 (१.१२.२०१८)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 


Multi Language |Offline reading | PDF