अमेरिकेतील हिंदू आणि अन्य संघटना यांच्याकडून पाकमध्ये होणार्‍या अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांचा निषेध

अमेरिकेतील संघटना पाकमधील हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराचा निषेध करतात; मात्र भारतातील बलाढ्य हिंदुत्वनिष्ठ संघटना निष्क्रीय रहातात !

प्रतीकात्मक चित्र

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील हिंदू अमेरिकन फाऊंडेेशन, आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य संघटना आणि इतर अनेक तज्ञ, आंतरधर्मीय कार्यकर्ते अन् संघटना यांच्या वतीने अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूत असद मजीद खान यांच्याकडे पत्राद्वारे पाकमध्ये प्रतिदिन हिंदु आणि ख्रिस्ती मुली यांना पळवून त्यांचे होणारे धर्मांतर आणि बळजोरीने केला जाणारा विवाह यांंचा निषेध करण्यात आला. या संदर्भात त्वरित कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

हिंदू अमेरिकन फाऊंडेशनचे संचालक जय कंसारा यांनी याविषयी सांगितले की, पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असून त्याकडे शासनाने लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मधल्या काळात ख्रिस्ती धर्मीय आशिया बीबी आणि अहमदिया समाजाचे डॉ. अब्दुल शकूर प्रकरणी न्याय मिळाला होता; मात्र त्यानंतर शेकडो हिंदू आणि ख्रिस्ती मुली यांना पळवून नेण्यात आले आहे. नुकतेच सिंध प्रांतातून १४ वर्षीय रीना आणि १६ वर्षीय रविना या मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आले आणि त्यांचा विवाह मुसलमानांशी करून देण्यात आला. अल्पवयीन मुलींच्या विवाहाला कायद्यानुसार बंदी असतांनाही न्यायालयानेही हे विवाह कायदेशीर ठरवले, ही दुःखाची गोष्ट आहे. असे प्रकार प्रतिदिन घडत असून त्यावर उपाययोजना करण्याची विनंती वरील पत्रात केली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now