परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ५ मे २०१९ या दिवशी करण्यात आलेल्या सौरयागाच्या दिवशी सायंकाळी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात तेजतत्त्वस्वरूपात लालसर प्रकाश पसरणे !

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात लालसर प्रकाश पसरण्यापूर्वीचे छायाचित्र
रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात लालसर प्रकाश पसरल्यानंतरचे छायाचित्र
प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवानिमित्त नाडीवाचन झाल्यावर घरातील संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातील त्यांचा तोंडवळा आणि हात पिवळा होणे अन् दुसर्‍या छायाचित्रातील प.पू. डॉक्टरांचा तोंडवळा गुलाबी होणे

‘प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांनी नाडीवाचन केले. जगभरातील साधकांसाठी या नाडीवाचनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. नाडीवाचन झाल्यानंतर बेळगाव येथील घरातील ध्यानमंदिरात असलेल्या संत भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर यांच्या छायाचित्रांमध्ये पुष्कळ पालट जाणवले. संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातील त्यांचा तोंडवळा आणि हात नेहमीच्या तुलनेत अधिक पिवळा झाला आहे अन् प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रातील त्यांचा तोंडवळा पुष्कळ गुलाबी झाला आहे. ‘महर्षि साक्ष देतात, तशीच साक्ष भगवंतही आपल्याला देत असतो’, याचीच ही साक्ष आहे.’

– सौ. अंजली कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.५.२०१६)

वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

‘सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे अनेक बुद्धीअगम्य घटना घडत असतात. त्याचप्रमाणे साधकांच्या घरीही अशा घटना घडतात. या पृष्ठावर बेळगाव येथील एका साधिकेच्या घरातील परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत भक्तराज महाराज यांचा तोंडवळा अनुक्रमे गुलाबी अन् पिवळा होणे, तसेच सौरयागाच्या वेळी केवळ सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचेच तोंडवळे उजळणे, अशा वैशिष्ट्यपूर्ण घटना घडत आहेत. ‘वैज्ञानिकदृष्ट्या यामागचे कारण कोणतेे ? कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे याचे संशोधन करता येईल ?’, या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(संपर्क : श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, इ-मेल : [email protected])


Multi Language |Offline reading | PDF