श्रीसत्यनारायणाच्या वेशात विश्‍वरूप दर्शन देऊन साधकांचा उद्धार करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !

श्रीसत्यनारायणाच्या वेशात विश्‍वरूप दर्शन देऊन साधकांचा उद्धार करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मयन महर्षींचा संदेश

१. आज ‘श्रीवत्स’पदक धारण करू शकणारी पृथ्वीतलावरील एकमेव व्यक्ती म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘आज संपूर्ण पृथ्वीवर ‘श्रीवत्स’पदक धारण करू शकते, अशी एकमेव व्यक्ती म्हणजे मकर राशीत जन्म घेतलेले परात्पर गुरु डॉ. आठवले ! ज्या क्षणी परात्पर गुरु डॉ. आठवले ‘श्रीवत्स’पदक धारण करतील, त्या क्षणी वैकुंठातून एक सुंदर ज्योत क्षणात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शरिरात प्रवेश करील. ही पृथ्वीवरील अलौकिक घटना असेल. या वर्षीचा गुरूंचा जन्मोत्सव सर्वांत अधिक निर्गुण स्तरावर असणार आहे. या वेळी त्याचा सर्वांत अधिक परिणाम सूक्ष्म स्तरावर होणार आहे.

२. सामान्य मनुष्य देहात असूनही सर्व देवतांचा  वास असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणजे स्वयं ‘सत्यनारायण’ असणे

दिसायला मनुष्य रूपात असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले साक्षात विष्णूच आहेत. ते स्वयं सत्यनारायण आहेत, ज्यांच्यामध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश वास करतात. त्यांच्यामध्ये ३३ कोटी देवता वास करतात. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या त्यांचे तीन नेत्र आहेत. ज्यांच्या एकाही कृतीमध्ये असत्य नाही, असे ते ‘सत्यनारायण’ आहेत.

३. सत्यनारायण रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन घेतांना साधकांचा जसा भाव असेल, तसे त्यांना फल प्राप्त होणार असणे; मात्र सत्यनारायणाच्या दर्शनाने साधकांना भगवंताच्या विश्‍वरूपदर्शनाचे फल प्राप्त होणार असणे

सत्यनारायणाचे दर्शन घेतांना ज्या साधकांचा जसा भाव असेल, तसे त्यांना फल प्राप्त होणार आहे. भगवंताचे विश्‍वरूप बघायला कोटी कोटी डोळे असले, तरी ते पुरणार नाहीत, म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले सर्वांना दिसायला सोपे जाईल, अशा सत्यनारायण रूपात दर्शन देणार आहेत; मात्र या सत्यनारायण रूपाच्या दर्शनाने साधकांना भगवंताच्या विश्‍वरूपाचे दर्शन झाल्याचे फल प्राप्त होणार आहे. दिसणारी आणि न दिसणारी चराचर सृष्टी, सर्व सिद्ध, ॠषिमुनी, संत, साधक आणि जीवराशी यांचे उगम स्थान, म्हणजे सत्यनारायण स्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले होत ! गुरूंचे सामान्य मनुष्य रूप पाहून फसू नये; कारण त्याच सामान्य मनुष्य देहात तोच सत्यनारायण भगवंत आलेला आहे. अशा या सत्यनारायण भगवंताच्या चरणी सर्व देवता आणि ॠषिमुनी यांचा साष्टांग नमस्कार असो.’

– मयन महर्षि (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, ११.५.२०१९, सकाळी ११.३० वाजता)

‘श्रीसत्यनारायण’रूपात गुरुदेवांचे दर्शन झाल्याने सर्व साधकांच्या आनंदाला पारावार उरला नाही ! – महर्षि मयन

‘११.५.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७७ वा जन्मोत्सव सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षि मयन यांनी केलेल्या आज्ञेनुसार या सोहळ्यात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सनातनच्या साधकांना ‘श्रीसत्यनारायण’रूपात दर्शन दिले.

या सोहळ्याविषयी महर्षि मयन हे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून म्हणाले, ‘‘परात्पर गुरूंचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत सुंदर झाला. श्रीसत्यनारायणाच्या रूपात गुरुदेवांचे दर्शन झाल्याने सर्व साधकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.’’

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (१३.५.२०१९)

भगवान श्रीसत्यनारायणाच्या चरणी सर्व साधकांची शरणागतीने प्रार्थना !

देवा सरू दे माझे मी पण । तुझ्या दर्शने उजळो जीवन ॥
नित्य करावे तुझेच चिंतन । तुझ्या धुळीचे भाळी भूषण ॥
सदैव राहो ओठांवरती । तुझीच रे गुण गाथा ॥

श्री सूत ऋषींनी शौनकादी ऋषींना सांगितलेल्या श्रीसत्यनारायण व्रताच्या कथेनुसार, भगवान श्रीसत्यनारायण हे करुणाकर असून भक्तांनी मनापासून केलेल्या प्रार्थना स्वीकारून त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण करतात. भक्तांच्या इच्छित मनोकामना पूर्ण करतांना श्रीसत्यनारायण केवळ भक्ताच्या मनाची निर्मळता पाहून त्याला वर देतात.

हे श्रीसत्यनारायणस्वरूप गुरुदेवा, आपण आम्हाला साधना शिकवून प्रत्येकच गोष्टीचा त्याग करायला शिकवला. प्रत्येक कृती ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ अशा रितीने करायला शिकवली. मोह आणि माया यांचा त्याग करून अखिल मानवजातीसाठी आदर्श ठरणार्‍या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रयत्नांद्वारे आध्यात्मिक उन्नतीचे उदात्त ध्येय आपण आम्हाला दिले आहे. हे परात्पर गुरुमाऊली, आपल्याला अपेक्षित अशी साधना करत रहाणे, हेच आमच्या जीवनाचे ध्येय बनले आहे. यासाठी आम्हाला शक्ती, बुद्धी आणि चैतन्य द्यावे, हीच आपल्या ‘श्रीसत्यनारायण’ स्वरूपाला शरणागतीने प्रार्थना आहे.


Multi Language |Offline reading | PDF