रुग्णाच्या जेवणात कापसाचा बोळा : पुणे येथील जहांगीर रुग्णालयाला १ लाख रुपयांचा दंड

  • रुग्णांच्या आयुष्याशी खेळणारे रुग्णालय प्रशासन ! रुग्णालयाच्या उपाहारगृहाच्या स्वच्छतेची नियमित पडताळणी होत नाही का ?
  • असा हलगर्जीपणा रुग्णांच्या जिवावर बेतला, तर त्याचे दायित्व कुणाचे ?

पुणे – जहांगीर रुग्णालयामध्ये एका महिला रुग्णाने मागवलेल्या सूपमध्ये कापसाचा बोळा आढळला होता. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने जहांगीर रुग्णालयाला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने रुग्णालयाच्या उपाहारगृहाची (कँटीनची) पडताळणी केल्यावर तेथे अस्वच्छता असल्याचे आढळून आले. या पडताळणीच्या वेळी आढळून आलेल्या त्रुटी पूर्ततेचा अहवाल सादर करण्याची नोटीस बजावली असून मे मासाच्या अखेरीपर्यंत सुधारणा करण्याची संधी दिली आहे. महंमदवाडी येथील महेश सातपुते यांनी अन्न आणि औषध प्रशासन, महापालिकेचा आरोग्य विभाग, हॉस्पिटल प्रशासन, पोलीस यांच्याकडे या संदर्भातील तक्रार केली होती.


Multi Language |Offline reading | PDF