योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळणे

संतांनी सांगितलेल्या आध्यात्मिक उपायांचे अनन्यसाधारण महत्त्व

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘परात्पर गुरु डॉ. आठवले विश्‍वकल्याणाकरता सत्त्वगुणी लोकांचे ईश्‍वरी राज्य येण्यासाठी प्रयत्नरत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष १९८९ पासून त्यांच्या जीवनात बर्‍याचदा महामृत्यूयोग आले आहेत. ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी त्यांचे देहधारी अस्तित्व आवश्यक असल्याने योगतज्ञ दादाजी वैशंपायन (कल्याण, जिल्हा ठाणे), श्रीकृष्ण कर्वेगुरुजी (पुणे) यांसारखे काही संत त्यांना स्वतःहून आध्यात्मिक साहाय्य करत आहेत. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आध्यात्मिक त्रासांपासून रक्षण होऊन त्यांना धर्मकार्यासाठी उत्तम आरोग्य लाभावे’, यासाठी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी त्यांना एक संस्कारित पेटी दिली आणि पुढीलप्रमाणे आध्यात्मिक उपाय (टीप) करण्यास सांगितले – ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी झोपतांना संस्कारित पेटी ३ दिवस त्यांच्या उशीशेजारी ठेवावी’. त्यानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ४.२.२०१९ ते ६.२.२०१९ या कालावधीत ते आध्यात्मिक उपाय केले. ‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय केल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

टीप – आध्यात्मिक उपाय : एखाद्या विशिष्ट घटकातील सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीतील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट होणे आणि सकारात्मक स्पंदनांत वृद्धी होणे, याला ‘आध्यात्मिक उपाय होणे’, असे म्हणतात. आध्यात्मिक त्रास असलेली व्यक्ती साधना करणारी असल्यास तिची संवेदनशीलता वाढलेली असते. त्यामुळे तिला ‘स्वतःवर आध्यात्मिक उपाय होत आहेत अथवा नाही ?’, हे जाणवू शकते.

यू.टी.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत ४.२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपाय आरंभ करण्यापूर्वी त्यांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. परात्पर गुरु डॉक्टरांनी ३ दिवस आध्यात्मिक उपाय केले. प्रत्येक दिवशी त्यांच्या केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांना विचारून पुढे आणखी १ दिवस तो उपाय केला. तेव्हा चौथ्या दिवशीही उपाय केल्यानंतर त्यांच्या केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या.

योगतज्ञ दादाजींनी दिलेली संस्कारित पेटी

या चाचणीत ४.२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी संस्कारित पेटीचा उपयोग करण्यास आरंभ करण्यापूर्वी त्या संस्कारित पेटीच्या उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. त्यांनी ती पेटी आध्यात्मिक उपायांसाठी वापरल्यानंतर ६ आणि ७ फेब्रुवारी २०१९ या दिवशी (म्हणजे तिसर्‍या अन् चौथ्या दिवशी) त्या पेटीच्या केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजण्यांच्या सर्व नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संस्कारित पेटी यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. आध्यात्मिक उपाय केल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत उत्तरोत्तर वाढ होणे

२ आ २. तिसर्‍या आणि चौथ्या दिवशी संस्कारित पेटीच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ होणे

टीप – संस्कारित पेटीची १ ल्या आणि २ र्‍या दिवशी चाचणी केलेली नाही.

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात. सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

२ इ १. आध्यात्मिक उपाय केल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एकूण प्रभावळीत उत्तरोत्तर वाढ होणे

२ इ २. तिसर्‍या आणि चौथ्या दिवशी संस्कारित पेटीच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे

टीप – संस्कारित पेटीची १ ल्या आणि २ र्‍या दिवशी चाचणी केलेली नाही.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आध्यात्मिक उपायांसाठी दिलेल्या संस्कारित पेटीच्या माध्यमातून त्यांना पुष्कळ प्रमाणात चैतन्य मिळणे : योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील संकटे दूर होऊन त्यांना धर्मकार्यासाठी उत्तम आरोग्य लाभावे’, यासाठी पूजाविधीद्वारे संस्कार करून पेटीमध्येे आवश्यक शक्ती (सकारात्मक ऊर्जा) संक्रमित केली होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी ४ दिवस उपाय केल्यावर त्यांना प्रत्येक दिवशी संस्कारित पेटीच्या माध्यमातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य मिळाले. त्यामुळे त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ४ थ्या दिवशी केलेल्या उपायातूनही लाभ होणे; पण त्याचे प्रमाण पहिल्या ३ दिवशी केलेल्या उपायांच्या तुलनेत अल्प असणे, यामागील कारण : पहिले ३ दिवस परात्पर गुरु डॉक्टरांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत लक्षणीय वाढ होत गेल्याचे चाचणीतून दिसून आले. तेवढी वाढ पुढे आणखी १ दिवस उपाय केल्यानंतर मात्र दिसून आली नाही. याचे कारण पुढे दिले आहे. योगतज्ञ दादाजी वैशंपायन हे उच्च कोटीचे संत आहेत. त्यांनी आवश्यक ती शक्ती परात्पर गुरु डॉक्टरांना मिळण्यासाठी ३ दिवसांसाठीचा संकल्प करून उपाय सांगितला होता. त्यानुसार परात्पर गुरु डॉक्टरांना आवश्यक ती शक्ती तिन्ही दिवशी मिळाल्याने अपेक्षित कार्यपूर्ती झाली होती. यातून योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची सूक्ष्मातील जाणून उपाय सांगण्यातील अचूकता लक्षात येते. तसेच त्यांचा अध्यात्मातील अधिकार सिद्ध होतो.

३ इ. आध्यात्मिक उपायांसाठी दिलेल्या संस्कारित पेटीच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत तिसर्‍या अन् चौथ्या दिवशी पुष्कळ प्रमाणात वाढ होणे : संस्कारित पेटीमध्ये आरंभी सकारामक ऊर्जा होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी ती पेटी आध्यात्मिक उपायांसाठी वापरल्यानंतर तिसर्‍या आणि चौथ्या दिवशी त्या पेटीतील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले. यातून ‘संस्कारित पेटी परात्पर गुरु डॉक्टरांना चैतन्य मिळण्याचे माध्यम बनली होती’, असे लक्षात येते. ही पेटी ५ व्या दिवशी पाण्यात विसर्जन करण्यास योगतज्ञ दादाजी यांनी सांगितले. याचे कारण ‘संस्कारित पेटीतील शक्ती (चैतन्य) पाण्यात उतरल्याने समष्टीला त्याचा लाभ मिळेल.’ यातून योगतज्ञ दादाजी यांसारखे थोर संतविभूती समष्टीचा किती विचार करतात, हे लक्षात येते.

४.२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची एकूण प्रभावळ ३०.२१ मीटर होती. योगतज्ञ दादाजी यांनी सांगितलेले उपाय केल्यानंतर ७.२.२०१९ या दिवशी त्यांची एकूण प्रभावळ २२३.२० मीटर झाली होती; म्हणजे केवळ ४ दिवसांत त्यांच्या एकूण प्रभावळीत १९२.९९ मीटर एवढी लक्षणीय वाढ झाली होती. यातून ‘योगतज्ञ दादाजींनी दिलेल्या आध्यात्मिक उपायांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळले’, असे लक्षात येते. अशा थोर संतविभूतीप्रती शतश: कृतज्ञता !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२२.२.२०१९)

ई-मेल : [email protected]

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रभावळ वाढली, तरी पेटीची प्रभावळ अल्प न होता उलट वाढण्याचे कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले : ४.२.२०१९ ते ७.२.२०१९ या काळांत मला उपायांसाठी दिलेल्या पेटीची प्रभावळही १३.२६ पासून ३१.१५ इतकी वाढली. याचे वैशिष्ट्य हे की, माझी प्रभावळ वाढली, तरी पेटीची प्रभावळ अल्प झाली नाही, उलट वाढली. याचे कारण काय ?

योगतज्ञ दादाजी वैशंपायन : उपायांच्या पेटीत तशीच सिद्ध शक्ती अंतर्भूत केली असल्यामुळे प्रभावळ वाढत गेली, तसेच तुमचे चैतन्यही त्यात अंतर्भूत आहे. (७.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF