प्राण्यांचे अधिकार धार्मिक अधिकारांपेक्षा अधिक महत्त्वाचे ! – डेन्मार्क

‘हलाल’ आणि ‘कोशर’ पद्धतीने पशूहत्या करण्यावर बंदी घातली

कोपेनहेगन (डेन्मार्क) – सामाजिक कार्यकर्त्यांकडून मागणी केल्याच्या अनेक  वर्षांनंतर डेन्मार्क सरकारने धार्मिक रूढींचे पालन करत प्राण्यांची ‘हलाल’ (प्राण्यांची हळूहळू हत्या करणे) आणि ‘कोशर’ (एका झटक्यात हत्या करणे) पद्धतीने कत्तल करण्यावर बंदी घातली आहे. गेल्या आठवड्यात घोषित करण्यात आलेल्या कायद्यातील पालटाला ज्यू धर्माच्या नेत्यांनी विरोध केला आहे, तर मुसलमानांनी त्याला ‘धार्मिक स्वातंत्र्यामध्ये स्पष्ट हस्तक्षेप’, असे म्हटले आहे.

युरोपियन नियमांनुसार प्राण्यांची कत्तल करण्याआधी त्यांना बेशुद्ध करण्याची आवश्यकता आहे; परंतु ज्यू आणि इस्लाम यांच्या धार्मिक आधारांवर शासन सवलत देत होते. इस्लामी कायद्यांतर्गत मांस ‘हलाल’ आणि ज्यू कायद्यांतर्गत मांस ‘कोशर’ मानले जाण्यासाठी जेव्हा प्राण्यांची कत्तल केली जाते, तेव्हा ते शुद्धीवर असले पाहिजेत. आता डेन्मार्क शासनाने ही सवलत काढून टाकण्याचे ठरवले आहे. त्यासाठी कृषी आणि अन्नमंत्री डॅन जोर्जेन्सन यांनी डेन्मार्कच्या वृत्तवाहिनीला सांगितले की, प्राण्यांचे अधिकार धार्मिक अधिकारांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now