पश्चिम बंगालमधील मुसलमान ‘वन्दे मातरम्’च्या घोषणा देणार का ?

उद्धव ठाकरे यांचा ममता बॅनर्जी यांना प्रश्न

मुंबई – बंगाल हा भारताचाच भाग आहे. तेथे जाण्या-येण्यासाठी ‘व्हिसा’ची आवश्यकता भासत नाही. गेल्या काही वर्षांपासून तेथील समाजमन अस्वस्थ आहे. बांगलादेशातून लाखो घुसखोर बंगालमध्ये आले आहेत आणि मतांच्या राजकारणासाठी ममता बॅनर्जी यांनी त्यांना संपूर्ण संरक्षण दिले. तेथे आता हिंदु आणि मुसलमान अशी फाळणी झाली आहे. ही स्थिती बंगालसारख्या सीमावर्ती राज्यास घातक आहे. भाजप ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत असल्याने त्याचा ममता बॅनर्जी यांना संताप आहे. आम्ही ‘जय हिंद’ आणि ‘वन्दे मातरम्’च्या घोषणा देऊ’, असे त्या म्हणाल्या; पण बंगालमधील मुसलमान ‘वन्दे मातरम्’च्या घोषणा देणार आहेत का ?, असा प्रश्न शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी ‘दैनिक सामना’च्या अग्रलेखातून विचारला आहे.

यात त्यांनी पुढे म्हटले आहे,

१. यंदा पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभांना ममता बॅनर्जी यांनी प्रारंभीपासूनच विरोध केला. भाजपच्या नेत्यांची हेलिकॉप्टर्स कोलकाता, तसेच इतरत्र उतरू न देण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांच्या सरकारने घेतला आणि वादळाची ठिणगी स्वतःच टाकली. ही कसली अरेरावी ?

२. ‘अमित शहा हे काही ‘भगवान’ नाहीत. त्यांच्याविरुद्ध निदर्शने झाली, तर काय बिघडले ?’, असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी विचारला. अमित शहा देव नसतीलही; पण ममताही देवी दुर्गा नाहीत. बंगालमध्ये आधी मार्क्सवाद्यांनी हिंसाचार पेरला; मात्र त्यात त्यांचाच बळी गेला. आता ममता बॅनर्जी नेमके तेच करत आहेत. त्यात राज्याची होरपळ होत असून देशाला ते घातक आहे.


Multi Language |Offline reading | PDF