महिलेच्या अंगावर गरम कॉफी सांडल्यावरही तिला वैद्यकीय साहाय्य न करणाऱ्या ‘एमिरेट एअरवेज’ला ३ लाख ७१ सहस्र ३०० रुपयांचा दंड

व्यावसायिक शिक्षणासमवेत शाळांतून नैतिकतेचे शिक्षण दिल्यास नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होऊन अशा प्रकारच्या समस्या निर्माण होणार नाहीत !

मुंबई – ‘एमिरेट एअरवेज’ या विमान आस्थापनेच्या विमानातून प्रवास करणाऱ्या  एका महिला प्रवाशाच्या अंगावर आस्थापनाच्या कर्मचाऱ्याकडून गरम कॉफी सांडली. या वेळी तिला वैद्यकीय साहाय्य करण्याचे सौजन्यही विमान आस्थापनाकडून दाखवण्यात न आल्याने सदर महिलेला संपूर्ण प्रवासात त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी पीडित महिलेने केलेल्या तक्रारीवरून ‘दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचा’ने विमान आस्थापनाला ३ लाख ७१ सहस्र ३०० रुपये दंड ठोठावला आहे. ‘ही एकप्रकारची क्रूरता आहे. विमानसेवेने कर्तव्यात कुचराई केली आहे, तसेच अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे’, असे निरीक्षण ग्राहक मंचाने नोंदवले आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार त्या नायजेरिया येथून विमानाने परत येत असतांना हवाई सुंदरीच्या हातातील ‘ट्रे’मधून गरम कॉफी सांडल्याने महिलेचे शरीर भाजले. विमानप्रवासात वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तिला नवी मुंबई येथे रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यासाठी तिला १० दिवसांच्या उपचारांचे देयक ७१ सहस्र ३०० रुपये आणि ‘प्लास्टिक सर्जरी’साठी ६ लाख ५० सहस्र रुपये इतका व्यय आला.


Multi Language |Offline reading | PDF