वैभववाडीतील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पात सहस्रो कोटी रुपयांचा घोटाळा

मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

भ्रष्टाचार होत नाही, असे सरकारचे एकतरी खाते आहे का ?

मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीमधील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पात सहस्रो  कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वर्ष २००५ मध्ये ५४ कोटींचा खर्च अपेक्षित असलेला हा प्रकल्प आता १ सहस्र ६०० कोटी रुपयांवर आला आहे. याविषयी राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या धरणाच्या कामामुळे ३ गावे पाण्याखाली जाणार असून १ सहस्र ८०० प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन न करताच धरण बांधण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे, असा आरोप करत स्थानिक रहिवासी तानाजी कांबळे यांनी अधिवक्ता आशिष गिरी यांच्याद्वारे ही याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेची दखल घेत राज्य सरकारला १७ जूनला होणाऱ्या पुढील सुनावणीत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF