राजापूर (जिल्हा सातारा) येथील आश्रमात प.पू. गगनगिरी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

पाटण, (जिल्हा सातारा), १५ मे (वार्ता.) – येथील राजापूर गावामध्ये विश्‍वगौरव विभूषित प.पू. स्वामी गगनगिरी महाराज सेवा आश्रमात प.पू. आशिष महाराज यांच्या शुभहस्ते, तसेच साधू-संत-महंत यांच्या वंदनीय उपस्थितीत प.पू. गगनगिरी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई उपस्थित होते.

संस्कृती रक्षणासाठी धर्माचरण आवश्यक ! – प.पू. आशिष महाराज

प.पू. गगनगिरी महाराज हे थोर जलतपस्वी होते. साधना करतांना ते घंटोन्घंटे पाण्यात तपश्‍चर्या करत होते. पाणी हेच त्यांचे जीवन होते. प.पू. गगनगिरी महाराज यांच्या विचारांचा पगडा आजही समाजमनावर असल्याचे दिसून येते. पती आणि पत्नी ही संसाराची दोन चाके आहेत. ती व्यवस्थित असतील, तरच संसार सुखाचा होईल. दोघांनी एकमेकांचा आदर करून एकमेकांना किंमत दिली पाहिजे, तरच कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालेल. चांगल्या कुटुंबासाठी सत्विचारांची जोपासना आवश्यक आहे. भारतीय संस्कृती महान असून तिच्या रक्षणासाठी प्रत्येकाने शुद्ध धर्माचरण करणे आवश्यक आहे, असे आवाहन प.पू. गगनगिरी महाराज यांचे शिष्य प.पू. आशिष महाराज यांनी केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now