शीव रुग्णालयात महिलेवर बलात्कार !

रुग्णालयात २४ घंटे सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही असतांनाही बलात्कार होणे दुर्दैवीच ! रुग्णालयाची यंत्रणा किती कुचकामी आहे, हेच यातून दिसून येते. उत्तरदायी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केल्यासच याला आळा बसू शकेल !

मुंबई – शीव रुग्णालयात ३७ वर्षीय महिलेवर बलात्कार करणारा तेथील स्वच्छता कामगार दीपक अन्नाप्पा कुंचीकुर्वे (वय ३१ वर्षे) याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही २४ घंटे कार्यरत असतांनाही ही घटना घडली. रुग्णालयातील शुल्कामध्ये सवलत देणारा अर्ज भरण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडित महिलेवर बलात्कार केला.


Multi Language |Offline reading | PDF