काश्मीरमध्ये धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमध्ये ४७ सैनिक घायाळ

  • ‘आतंकवाद आता सहन करणार नाही’, असे म्हणणारे पंतप्रधान मोदी सैनिकांवर दगडफेक करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात काय कृती करणार आहेत ?
  • दगडफेक करणार्‍यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश भाजप सरकार का देत नाही? कि ‘सैनिकांनी दगडफेक सहन करावी’, असे त्यांना वाटते ?
  • काँग्रेसच्या राज्यात सैनिकांचे हात बांधले गेले होते. भाजपच्याही राज्यात असेच आहे, हे लक्षात घ्या !

श्रीनगर – काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गावर येणार्‍या बारामुल्ला जिल्ह्यातील मीरगुंड, चैनाबाल, हार्थरथ, सिंहपोरा, झील ब्रीज, कृपालपोरा आणि हांजीवेरा येथे सैनिकांवर धर्मांधांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. यात ४७ सैनिक घायाळ झाले. यामध्ये एका साहाय्यक कमांडरच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. या वेळी सैनिकांनी केलेल्या प्रतिकारामध्ये ७ धर्मांध घायाळ झाले.


Multi Language |Offline reading | PDF