(म्हणे) ‘नन’वरील बलात्कार ही क्षुल्लक गोष्ट !’ – थलासरी (केरळ) येथील बिशपचे विधान

चर्च संस्थेकडून प्रारंभीपासून या बलात्काराला खोटे ठरवण्याचा किंवा त्याला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातूनच या ननच्या प्रकरणात आंदोलन करणार्‍या ५ ननचे स्थानांतर करण्याचा प्रयत्नही चर्चकडून झाला होता, तो आंदोलन करून रहित करण्यास चर्चला भाग पाडण्यात आले होते. त्यामुळे थलासरीच्या बिशपकडून असे विधान करणे आश्‍चर्यकारक म्हणता येणार नाही; मात्र हिंदूंच्या संतांवरील खोट्या आरोपांविषयी बोलणारे या बिशपच्या किंवा चर्च संस्थेच्या विरोधात बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

थिरूवनंतपूरम् – केरळ राज्यातील ननवर बिशपने केलेल्या बलात्काराच्या घटनेला थलासरी येथील चर्चच्या बिशपने ‘क्षुल्लक’ म्हटले आहे.

१२ मे या दिवशी कोट्टायम येथे आयोजित केलेल्या एका युवा बैठकीत या बैठकीत बिशप ने त्याचे मत नोंदवले होते. थलासरी येथील बिशपला कोट्टायम येथील बैठकीत प्रमुख भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या बलात्कार प्रकरणातील आरोपी माजी बिशप फ्रँको मुलक्कलला वाचवण्यासाठी थलासरी येथील चर्चच्या बिशपने केलेल्या भाषणाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

प्रसारमाध्यमांनी फ्रँको मुलक्कल याने केलेल्या  बलात्काराच्या प्रकरणातील आरोपांची विस्तृत माहिती देऊन चर्चची प्रतिष्ठा धुळीला मिळवली, असे सांगत थलासरी येथील बिशपने प्रसारमाध्यमांना दोष दिला. या प्रकरणाची तथ्ये न पडताळता किंवा आरोपांविषयी सत्य जाणून न घेता चर्चला अपकीर्त करण्यासाठी प्रसारमाध्यमांना पैसे देण्यात आले आहेत, असा दावाही त्यांनी केला. (जर ‘ख्रिस्त्यांच्या चर्चला अपकीर्त करण्यासाठी प्रसारमाध्यमांना पैसे पुरवण्यात येतात’, असे म्हटले जात असेल, तर ‘हिंदूंच्या संतांना आणि हिंदूंच्या संघटनांना अपकीर्त करण्यासाठीही प्रसारमाध्यमांना पैसे देण्यात आले’, असे का म्हणता येणार नाही ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now