राजस्थानच्या सरकारी रुग्णालयातील प्रसुतीकक्षात गायत्री मंत्र लावण्यास मुसलमानांचा विरोध

धर्मनिरपेक्ष देशात सरकारकडून अशा प्रकारचा आदेश नाही ! – आरोग्य सचिवांचा दावा

  • हिंदूंच्या धार्मिक मंत्रांचा चांगला परिणाम होत असतांना केवळ धार्मिक कारणावरून त्याला विरोध करणारे हिंदुद्वेषीच होत ! अन्य पंथियांमध्ये असा एखादा तरी मंत्र किंवा जप आहे का ?
  • धर्मनिरपेक्ष देशात दिवसातून ५ वेळा मशिदींवरील भोंग्यांवरून सर्व धर्मियांना अजान कशाला ऐकवली जाते ?
  • मुसलमान लगेच हिंदूंच्या मंत्रांना विरोध करतात; मात्र किती हिंदू मशिदींवरून होणार्‍या अजानचा विरोध करतात ?

जयपूर (राजस्थान) – राजस्थानच्या सरकारी रुग्णालयामध्ये प्रसुतीकक्षामध्ये संगीत उपचाराच्या अंतर्गत लावण्यात येणार्‍या गायत्री मंत्रांना येथील मुसलमानांनी विरोध केला आहे. दुसरीकडे राज्याचे विशेष सचिव (आरोग्य) डॉ. समित शर्मा यांनी म्हटले की, सरकारने अशा प्रकारचे गायत्री मंत्र लावण्याचा आदेश दिलेला नाही, तर मानसिक तणाव दूर करण्यासाठी संगीत लावण्यास सांगितले आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. जर काही रुग्णालयांमध्ये गायत्री मंत्र लावण्यात येत असेल, तर त्या विरोधात तक्रार नोंदवण्यात येईल.

सवाई माधोपूर या रुग्णालयात अशा प्रकारचे मंत्र लावण्यात येत आहे. याविषयी येथील डॉ. ग्रोवर म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून आम्ही येथे भजन आणि गायत्री मंत्र लावत आहोत.


Multi Language |Offline reading | PDF