‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या मुलीवर ओढवली भयाण परिस्थिती

  • वासनांध धर्मांधांचे खरे स्वरूप जाणा !

  • आधी धर्मांधांकडून बलात्कार, नंतर बळजोरीने विवाह, सासरी छळ यांमुळे मुलीचे मानसिक संतुलन बिघडले

  • सासरच्या जाचाला कंटाळून माहेरी आलेल्या आणि क्षुल्लक कारणावरून वादविवाद करणार्‍या मुलीची आईकडून रागाच्या भरात डोक्यात दगड घालून हत्या

बारामती (पुणे) – रमजान जावेद या धर्मांधाने ऋतुजा बोभाटे हिच्याशी बळजोरीने विवाह केला. लग्न झाल्यावर रमजान जावेद तिला नांदवायला सिद्ध नसल्याने ती पुन्हा माहेरी आली. ऋतुजा हिने दिलेल्या तक्रारीनुसार त्याने लग्नापूर्वी तिच्यावर बलात्कार केला होता. या सगळ्याचा पीडित मुलीसह तिच्या कुटुंबियांनाही मानसिक त्रास झाला. ऋतुजा बोभाटे हिची मनःस्थिती बिघडल्याने तिचे कुटुंबियांशी क्षुल्लक कारणांवरून सातत्याने खटके उडत होते. अशातच तिच्या आईने १४ मे या दिवशी रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली.

एकांगी वार्तांकन

या घटनेची सर्व प्रसारमाध्यमांनी नोंद घेतली; पण नोंद घेतांना धर्मांधाची विकृती समोर न आणता ‘आईनेच केली मुलीची हत्या’ असे वर्णन केले. कुणाचीही हत्या होणे, हे सर्वथा अयोग्यच आहे; पण केवळ तेवढेच दाखवून धर्मांधाच्या वृत्तीवर पांघरूण घालणे, हे समाजाची दिशाभूल करण्यासारखे आहे. परिणाम भयावह असेल, तर त्यामागच्या कारणांचाही ऊहापोह करायला हवा. तो करण्याची सिद्धता न दर्शवणे, हे सत्यनिष्ठ पत्रकारितेचे लक्षण नाही.


Multi Language |Offline reading | PDF