चंद्राचा आकार ५० मीटरने आकुंचन पावला ! – नासा

मुंबई – पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राचा आकार ५० मीटरने आकुंचन पावल्याचे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. चंद्राचा व्यास ३ सहस्र ४७६ किमी आहे. याच आकारात ५० मीटरने घट झाली आहे. पृथ्वीवर होणार्‍या भूकंपांप्रमाणेच चंद्रावर चंद्रकंप होत असून त्यामुळे चंद्राचा आकार न्यून झाल्याचा शास्त्रज्ञांचा प्राथमिक अंदाज आहे.

पृथ्वीपासून चंद्र हा सरासरी ३ लाख ८४ सहस्र किमी अंतरावर आहे. चंद्र प्रतिवर्षी ३.८ सेंटीमीटरने दूर जात आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्या वेळी तो मोठा दिसतो. पृथ्वीपासून दूर जातो त्या वेळी पृथ्वीवरून पहातांना चंद्रबिंब छोटे दिसते. बुध ग्रहाचा आकारही न्यून होत आहे, तसेच पृथ्वीचा स्वत:भोवती भ्रमण करण्याचा वेगही मंदावत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now