(म्हणे) ‘विशिष्ट लोकांच्या आतंकवादी कारवायांचे उदात्तीकरण न थांबवल्यास त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ !’ – अशोक कांबळे, ‘भीम आर्मी’

हिरव्या आतंकवादापुढे शेपूट घालणार्‍या ‘भीम आर्मी’ची सहिष्णु हिंदूंना धमकी

नथुराम गोडसे यांना ‘हिंदु आतंकवादी’ म्हणणार्‍या कमल हसन यांच्या विरोधात उमटलेल्या प्रतिक्रियांनंतर ‘भीम आर्मी’ या संघटनेला पोटशूळ

मुंबई, १५ मे (वार्ता.) – अहिंसावादी गांधी यांची हत्या करणारे हिंदु महासभेचे सदस्य नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करून ‘हिंदु आतंकवादा’ला खतपाणी घालण्याचे काम करणार्‍या संघटनांवर कारवाई करण्यात यावी. ‘आतंकवादाला रंग नसतो’, हे जरी खरे असले, तरी देशात विशिष्ट रंगाच्या लोकांच्या आतंकवादी कारवायांचे चाललेले उदात्तीकरण थांबवण्यात यावे अन्यथा ‘भीम आर्मी’लाही त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, अशी धमकी ‘भीम आर्मी’चे महाराष्ट्र राज्याचे प्रमुक अशोक कांबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. (देशाला पोखरणार्‍या इस्लामी आतंकवादाविषयी ‘भीम आर्मी’ने कधी असे प्रसिद्धीपत्रक काढले आहे का ? कि केवळ हिंदूंना धमक्या देण्यातच ‘भीम आर्मी’ला भीमपराक्रम वाटतो ? – संपादक)

या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे की, हिंदु महासभेचे अभिषेक अग्रवाल यांनी कमल हसन यांना धमकी दिली आहे, तसेच तमिळनाडूचे मंत्री टी. राजेंद्र यांनी गोडसे यांचे समर्थन करतांना कमल हसन यांची जीभ छाटण्याची भाषा केली आहे. या लोकशाहीच्या देशात आतंकवाद पसरवण्याचा हा प्रकार आहे. गांधी यांची हत्या झाल्यानंतर पुण्यात पेढे वाटून आनंद साजरा केला जातो, हुतात्मा हेमंत करकरे यांना शाप देणार्‍या तथाकथित साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाते. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या दिवसाढवळ्या हत्या होतात. देशातील विचारवंतांच्या हत्येतील आरोपींच्या संशयाची सुई विशिष्ट वर्गाच्या लोकांकडे जाते. या लोकांचे उदात्तीकरण होणे, हे सर्वधर्मसमभाव असणार्‍या देशात निषेधार्ह आहे. (कोणाच्याही हत्येचे समर्थन होऊ शकत नाही; मात्र या देशात केवळ गांधी, डॉ. दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे आणि गौरी लंकेश यांच्याच हत्या झाल्या आहेत का ? काश्मीरमध्ये धर्मांधांनी केलेल्या हिंदूंच्या हत्या, तसेच बंगाल, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यांत हिंदुत्वनिष्ठांच्या झालेल्या अमानुष हत्या यांचे मूल्य नाही का ? – संपादक) अशा लोकांचे उदात्तीकरण करणार्‍या संस्था आणि संघटना यांचे अन्वेषण करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. देशद्रोही कारवायांत गुंतलेल्या सर्वच लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे नोंद करावेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now