काश्मीरमध्ये ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याने निदर्शने

बलात्काराच्या गुन्ह्यात दोषींना कठोर शिक्षा होत नसल्याचा परिणाम !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील संबल भागात चॉकलेटचे आमिष दाखवून एका ३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी मुलीने दिलेल्या माहितीवरून धर्मांध ताहीर अहमद मीर या २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. ‘आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी’, अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी १२ हून अधिक ठिकाणी निदर्शने केली. बांदीपोराचे पोलीस उपायुक्त शाहबाज मिर्झा यांनी ‘दोषीला कठोर शिक्षा नक्की मिळेल’, असे आश्‍वासन देत नागरिकांना शांतता राखण्यास सांगितले. या गुन्ह्याच्या अन्वेषणासाठी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्यात आले आहे.

धर्मांध ताहीर अहमद मीर

शरीयत कायद्यानुसार बलात्कार्‍याला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा दिली पाहिजे ! – मेहबूबा मुफ्ती

केवळ अशाच नव्हे, तर जिहादी आतंकवाद्यांशी लढणार्‍या सैनिकांवर दगडफेक करणार्‍यांना, काश्मीरमध्ये फुटीरतावादी कारवाया करणार्‍यांना, आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍यांना, तसेच देशद्रोही विधाने करणार्‍यांनाही अशीच शिक्षा दिली पाहिजे ! अशा मागण्या देशभक्त भारतियांनी केल्या, तर मेहबूबा मुफ्ती त्या स्वीकारणार आहेत का ?

या घटनेवर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करतांना म्हटले की, संबलमध्ये ३ वर्षांच्या मुलीवरील बलात्काराविषयी ऐकून मला धक्का बसला आहे. अशा वेळी शरीयत कायदाच योग्य असल्याचे लक्षात येते. यामध्ये मुलींवर अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य करणार्‍याला दगड मारून ठार केले जाते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now