पैसा वाढला; म्हणून सुख वाढत नसते ! – जगातील तिसर्‍या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती वॉरन बफेट

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय, बफेट यांच्या विधानावरून तरी काही शिकतील का ?

ओमाहा (अमेरिका) – हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाचे सुख वृद्धींगत होत नसते. तुम्ही जर ५० सहस्र डॉलर (३५ लाख रुपये) किंवा १ लाख डॉलरच्या (७० लाख रुपयांच्या) पगारात सुखी होऊ शकत नसाल, तर ५ सहस्र कोटी डॉलर्सच्या (साडेतीन लाख कोटींहून अधिक रुपये) पगारातही तुम्ही सुखी रहाणार नाही, असा सल्ला अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती वॉरन बफेट यांनी एका १३ वर्षांच्या मुलाला दिला आहे.

१. बफेट यांचे आस्थापन ‘बर्कशायर हॅथवे’ची गुंतवणूकदारांची वार्षिक बैठक येथे पार पडली. या बैठकीत प्रश्‍नोत्तरे होतात. आस्थापनाचे अध्यक्ष ८८ वर्षांचे वॉरन बफेट आणि उपाध्यक्ष ९५ वर्षांचे चेरी मंजर यांनी प्रश्‍नांना या वेळी उत्तरे दिली.

२. १३ वर्षांच्या मुलाने विचारले, ‘स्वत:वर, स्वत:च्या खर्चावर नियंत्रण कसे ठेवायचे? बचत कशी करावी ?’’ यावर मंजर म्हणाले, ‘‘तुमच्यात एक तर संयम असतो किंवा नसतो. त्यापलीकडे काहीच नसते.’’

३. यावर बफेट म्हणाले, ‘‘संयम राखणे, तसेच बचत करणे आवश्यक आहे, हे मान्य; मात्र ‘प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक कुटुंबाने बचत करायलाच हवी’, असा काही नियम नाही. तुमच्याकडे पैसे असतील, तर तुम्ही आता ‘डिझनीलॅण्ड’ला २ दिवसांसाठी फिरायला जाऊ शकता. तेच पैसे साठवले, तर काही वर्षांनी त्याच्या व्याजावर ‘डिझनीलॅण्ड’ला ७ दिवसांसाठी फिरायला जाऊ शकता. आता तुम्ही काय कराल ?’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now