कुर्ला येथे महिला पोलिसाकडे पाहून अश्‍लील चाळे करणारा पोलीस कह्यात

असे वासनांध पोलीस समाजातील वासनांधता कशी रोखणार ?

मुंबई – कुर्ला (पूर्व) येथील पोलीस वसाहतीमध्ये महिला पोलिसाकडे पाहून अश्‍लील चाळे करणार्‍या पोलीस हवालदाराला १२ मे या दिवशी अटक करण्यात आली. ११ मे च्या रात्री इमारतीच्या सज्जात उभ्या असलेल्या महिला पोलिसाला पाहून पोलीस हवालदाराने स्वत:चे कपडे काढून अश्‍लील चाळे केले. याविषयी महिला पोलिसाने त्वरित पोलीस नियंत्रण कक्षात कळवले. याप्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात विनयभंगाची तक्रार नोंदवण्यात आली असून त्याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे.


Multi Language |Offline reading | PDF