आफ्रिकेतील बुर्कीनो फासो देशामधील एका चर्चवरील जिहादी आतंकवादी आक्रमणात ६ जण ठार

श्रीलंकेत आणि आता आफ्रिकेतील देशात झालेल्या चर्चवरील आक्रमणानंतर ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणण्याचे धाडस ख्रिस्ती का करत नाहीत ?

ऊगादोगो (बुर्कीनो फासो) – आफ्रिका खंडाच्या पश्‍चिमेकडे असणार्‍या बुर्कीनो फासो या देशामधील डाब्लो शहरातील एका कॅथलिक चर्चवर १२ मे या दिवशी २० ते ३० जिहादी आतंकवाद्यांनी गोळीबार केला. यात एका पाद्य्रासह ६ जण ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले. चर्चमध्ये प्रार्थना चालू असतांना हे आक्रमण करण्यात आले. आतंकवाद्यांनी गोळीबारानंतर चर्चमध्ये लुटमारही केली, असे शहराचे महापौर आऊसमन झोंगो यांनी सांगितले.

डाल्बो शहर आणि जवळच्या भागामध्ये अल् कायदा, इस्लामिक स्टेट आणि स्थानिक जिहादी आतंकवादी संघटना ‘अंसारूल इस्लाम’ यांची दहशत आहे. मुसलमान तरुण मोठ्या संख्येने या संघटनांशी जोडले गेले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now