रमझानच्या काळात पहाटे मतदान घेण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

प्रत्येक गोष्टीत धर्म आणून स्वतःचे वेगळेपण जपणार्‍या धर्मांधांना दणका !

नवी देहली – रमझानच्या मासामध्ये पहाटे ५ वाजता मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ‘मतदानाची वेळ निश्‍चित करणे हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. यासाठी सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ पुरेशी आहे. सकाळी ७ वाजता अधिक तापमान नसते’, असे याचिका फेटाळतांना न्यायालयाने म्हटले आहे. अधिवक्ता निजामुद्दीन पाशा यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती. यापूर्वीच निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळलेली असतांनाही आयोगाच्या या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.


Multi Language |Offline reading | PDF