वर्ष २०४० पर्यंत जगभरात कर्करोगाचे दीड कोटी रुग्ण असतील ! – संशोधनाचा निष्कर्ष

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – वर्ष २०४० पर्यंत जगभरातील सुमारे दीड कोटी लोकांना कर्करोग होईल आणि त्यांना ‘केमोथेरपी’ घ्यावी लागेल. या रुग्णांवर उचपार करण्यासाठी सुमारे एक लाख कर्करोग तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असेल. यापैकी सर्वाधिक रुग्ण अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांतील नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांमधील असतील, असे ‘लँसेट ऑन्कोलॉजी जर्नल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या शास्त्रज्ञांच्या एका संशोधनात म्हटले आहे.

१. ‘कर्करोग रुग्णांच्या वाढत्या संख्येला त्याच प्रमाणे उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर काय उपाययोजना कराव्या लागतील ?’, याचा आढावा घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले आहे.

२. या संशोधातील निरीक्षणानुसार वर्ष २०१८ ते २०४० या कालावधीत ‘केमोथेरपी’ घेणार्‍या रुग्णांचे प्रमाण प्रतिवर्षी ५३ टक्क्यांनी वाढेल.

३. ‘न्यू साऊथ वेल्स विद्यापिठा’तील शास्त्रज्ञ ब्रूकी विल्सन म्हणाल्या की, कर्करोग रुग्णांचे वाढते प्रमाण आज आरोग्य क्षेत्रासमोरील सर्वांत मोठा आणि भविष्यात उग्र रूप धारण करणारा प्रश्‍न आहे.

४. सिडनीतील ‘न्यू साऊथ वेल्स’, ‘इनहॅम इन्स्टिट्यूट फॉर अप्लॉईड मेडिकल रिसर्च’, ‘किंगहॉर्न कॅन्सर सेंटर’, ऑस्ट्रेलियातील ‘लिव्हरपूल कॅन्सर थेरपी सेंटर’ आणि लिऑन येथील कॅन्सरविषयी संशोधन करणार्‍या संस्थेतील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF