(म्हणे) ‘नरेंद्र मोदी ‘नीच माणूस’, हे मी योग्यच बोललो होतो !’ – काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर

  • मणिशंकर अय्यर यांच्या या विधानावरून ‘प्रत्यक्षात कोण कसा आहे ?’, हे जनता ओळखणारच !
  • पाकिस्तानात जाऊन मोदी यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याविषयी चर्चा करणारे आणि पाकप्रेमी असलेले अय्यर यांना भाजपने आतापर्यंत कारागृहात न डांबल्याचा हा परिणाम होय !

नवी देहली – वर्ष २०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी ‘नीच प्रकारचा माणूस’, असा केलेला उल्लेख योग्यच होता. मी तेव्हा योग्य भविष्यवाणी केली होती कि नाही?’, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या एका लेखात म्हटले आहे. मोदी यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांचा आधार घेत अय्यर यांनी हा लेख लिहिला आहे.

वर्ष २०१७ मध्ये अय्यर यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना क्षमा मागावी लागली होती आणि नंतर काँग्रेसनेही त्यांना प्रसारापासून दूर ठेवले होते.

अय्यर यांच्या विधानावर काँग्रेसने, ‘चुकीचे वक्तव्य करणार्‍यांवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कारवाई करतात’, असे म्हटले आहे; मात्र राहुल गांधी यांच्याकडून अद्याप अय्यर यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. (अय्यर यांनी यापूर्वीही असे विधान केले होते; मात्र काँग्रेसने त्यांच्यावर कठोर कारवाई केली नव्हती. त्यामुळे आताही ती अशी कारवाई करील, याची शक्यता नाहीच ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF