हिंदु महासभेकडून अभिनेते कमल हसन यांना ठार मारण्याची धमकी

पंडित नथुराम गोडसे यांना ‘स्वतंत्र भारतातील पहिला हिंदु आतंकवादी’ म्हटल्याचे प्रकरण

  • आता हिंदु महासभेवर बंदी घालण्याची मागणी केली जाईल; मात्र ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा. १०० कोटी हिंदूंना संपवतो’, असे म्हणणारे अकबरुद्धीन ओवैसी यांच्या एम्आयएम् पक्षावर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही !
  • ‘मला बंदूक दिली, तर मी नरेंद्र मोदी यांना गोळ्या घालीन’, असे म्हणणारे लेखक विजय तेंडुलकर यांच्यावर कोेणतीही कारवाई झाली नव्हती !

मेरठ (उत्तरप्रदेश) – नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदु आतंकवादी होता, असे विधान करणारे अभिनेते आणि ‘मक्कल निधी मियाम’ पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांना ‘अखिल भारतीय हिंदू महासभे’ने जाहीरपणे ठार मारण्याची धमकी दिली आहे. ‘गोडसे यांच्याविषयी असे वक्तव्य करणारी व्यक्ती हिंदु धर्माला कलंक आहे’, असे विधान ‘अखिल भारतीय हिंदू महासभे’चे प्रदेश प्रवक्ता अभिषेक अग्रवाल यांनी येथे केले आहे. यापूर्वी ‘कमल हसन यांची जीभ छाटली पाहिजे’, असे विधान तमिळनाडूचे दुग्धोत्पादन मंत्री के.टी. राजेंद्र बालाजी यांनी केले होते.

अग्रवाल पुढे म्हणाले की, पंडित नथुराम गोडसे हे हिंदूंचे आदर्श होते आणि रहातील. जिहादी आतंकवाद्यांचे समर्थन करणारे फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, नवज्योतसिंह सिद्धू हे आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी गोडसे यांचे नाव आतंकवादाशी जोडण्याचे काम केेले जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF