बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसकडून भाजपच्या प्रचारामध्ये अडथळे

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची हुकूमशाही ! भाजपने देश आणि धर्म द्रोह्यांच्या विरोधात अशी हुकूमशाही राबवली असती, तर एव्हाना देशात शांतता निर्माण झाली असती !

कोलकाता – कोलकातामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘रोड शो’च्या काही घंटे आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या प्रचारार्थ भित्तीपत्रके आणि फलक तृणमूल काँग्रेस सरकारकडून काढून टाकण्यात आले. याशिवाय १३ मे या दिवशी अमित शहा यांचे हेलिकॉप्टर जाधवपूर येथे उतरवण्यास काही घंटे आधी अनुमती नाकारण्यात आली होती.

भाजपचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी दगडफेकही करण्यात आली होती. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या १५ मे या दिवशी होणार्‍या प्रचारसभेलाही अनुमती नाकारण्यात आली आहे. ‘भाजपच्या प्रचारसभांमध्ये तृणमूल काँग्रेस अडथळे निर्माण करत आहे’, असा आरोप भाजपने केला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now