एसएसआरएफची साधिका अ‍ॅलीस हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरणागतभावाने अर्पण केलेले भावसुगंधी पत्रपुष्प !

कु. अ‍ॅलिस

‘परम पूज्य

(परात्पर गुरु डॉ. आठवले),

तुम्ही मला आश्रमात रहाण्याची संधी दिलीत आणि आतापर्यंत माझ्यामध्ये जे पालट घडवून आणलेत, त्याबद्दल मी तुमच्या प्रती कृतज्ञ आहे. परम पूज्य, तुम्ही मला सात्त्विक करा अन् तुम्हाला अपेक्षित असे मला घडवा. मला स्वतःमध्ये पालट घडवून आणायचे आहेत. कृपया तुम्हीच या अन् माझ्यात पालट घडवा. तुम्हाला अपेक्षित असे साधनेसाठीचे प्रयत्न तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या. माझा तुमच्याप्रती अन् श्रीकृष्णाप्रती असलेला भाव वृद्धींगत करा. मला अखंड तुमच्या अनुसंधानात रहायचे असून प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्यावर अवलंबून रहायचे आहे. ‘काही होणार नाही’, या (माझ्यातील नकारात्मक) विचारापेक्षा ‘तुमच्या कृपेमुळे सर्वकाही शक्य आहे’, यावर माझी श्रद्धा असू द्या.’

– कु. अ‍ॅलिस (वय २० वर्षे), ब्रिटन. (७.४.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF