पोलिसांकडून ११० दंगलखोरांना अटक, तर ८ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात प्रविष्ट !

संभाजीनगर येथील गतवर्षीच्या दंगलीचे प्रकरण

हिंदूंनो, प्रत्येक क्षण वैर्‍याचा असल्याने स्वतःचे रक्षण करण्यासाठी संघटित व्हा !

संभाजीनगर – ११ मे २०१८ या दिवशी किरकोळ कारणावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात झालेल्या भीषण दंगलीला ११ मे या दिवशी १ वर्ष झाले. या दंगलीनंतर हिंदू आणि मुसलमान यांच्यात निर्माण झालेला दुरावा अल्प करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सातत्याने प्रयत्न केले. या प्रकरणी सिटीचौक, क्रांतीचौक आणि जिन्सी पोलीस ठाण्यात एकूण १६ गुन्ह्यांची नोंद झाली होती. या सर्व गुन्ह्यांत पोलिसांनी २ नगरसेवकांसह ११० दंगलखोरांना अटक करून ८ गुन्ह्यांत त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट केले आहे. अटकेतील आरोपी सध्या जामिनावर आहेत. (आतापर्यंत हिंदू-मुसलमान यांच्यामध्ये झालेल्या दंगलीत हिंदूंच्या मालमत्तेची प्रचंड हानी झाली असून हिंदूंना न्याय मिळालेला नाही, तसेच धर्मांधांना कोणतीही शिक्षा झालेली नाही. संभाजीनगर येथेही हिंदूंच्या मालमत्तेची प्रचंड हानी झाली आहे. दंगल घडवणार्‍या धर्मांधांवर पोलिसांनी कठोर कारवाई करणे अपेक्षित होते; प्रत्यक्षात तसे दिसून येत नाही. यासाठी हिंदूंनी पोलिसांवर अवलंबून न रहाता स्वतःचे संरक्षण स्वतः करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे. – संपादक)

१. ११ मेच्या रात्री मोतीकारंजा येथे किरकोळ कारणावरून हिंदू आणि मुसलमान यांच्या गटांत हाणामारी झाली.

३. या हाणामारीचे रूपांतर दंगलीत झाले. राजाबाजार, मोतीकारंजा, नवाबपुरा, शहागंज, चेलीपुरा आदी भागांत जाळपोळ, दगडफेक आणि लुटालुटीचे प्रकार दुसर्‍या दिवशी म्हणजे १२ मेच्या रात्रीही चालू होते.

४. राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलीस यांनी केलेल्या जोरदार कारवाईनंतर दंगलीवर नियंत्रण आणणे शक्य झाले होते.

५. या वेळी पोलिसांच्या गोळीबारात एका मुलाचा, तर दंगेखोरांनी घराला लावलेल्या आगीत एका वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला होता.

६. याशिवाय दगडफेक आणि पोलिसांच्या गोळीबारात घायाळ झालेल्यांची संख्या ३० हून अधिक होती.

७. या दंगलीत जमावाने केलेली जाळपोळ, लुटालूट आणि दगडफेक यांमध्ये कोट्यवधीं रुपयांची हानी झाली.

दंगलीची वर्षपूर्ती होऊनही पंचनामे कागदावरच !

गेल्या वर्षी झालेल्या दंगलीत दुकाने, वाहने आणि घरे या मालमत्तांची एकूण १० कोटी २१ लाख १५ सहस्र ६०० रुपयांची हानी झाल्याचे पंचनामे वर्षभरापासून कागदावरच आहेत. दंगलीतील हानीचा अंदाज नागरिकांच्या जबाबातून बांधण्यात आला होता. पंचनामे करूनही अजून शासनाकडून हानीग्रस्तांना काहीही साहाय्य मिळालेले नाही. अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड आणि सतीश सोनी यांच्या पथकांनी पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने शासनाकडे सादर केला होता. (शासनाचा भोंगळ कारभार ! पंचनाम्याची कागदपत्रे सादर होऊनही त्याकडे दुर्लक्ष करणारे दंगलग्रस्तांना कधीतरी हानीभरपाई मिळवून देतील का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF