श्रीलंकेत आता मशिदींमध्ये मौलवींनी केलेल्या भाषणांची प्रत द्यावी लागणार !

  • भारतात गेली ३ दशके जिहादी आतंकवाद चालू असतांना भारताने कधी असा आदेश दिला आहे का ?
  • आतंकवाद मुळापासून संपवण्यासाठी कसे प्रयत्न करायचे, हे भारतीय शासनकर्ते श्रीलंकेकडून शिकतील तो सुदिन !

कोलंबो – येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंका सरकार मुसलमानांवर कठोर निर्बंध घालत आहे. बुरखा आणि नकाब यांवर बंदी घातल्यानंतर आता मशिदींमध्ये मौलवींकडून केल्या जाणार्‍या भाषणाची प्रत देण्याचाही आदेश देण्यात आला आहे. येथील धार्मिक आणि सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले की, कट्टरपंथी विचारसरणी आणि भडकाऊ भाषणांसाठी मशिदींचा वापर होऊ नये, हा यामागचा हेतू आहे.


Multi Language |Offline reading | PDF