जळगाव, नंदुरबार, ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध उपक्रम !

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरांची स्वच्छता, सामूहिक नामजप, सामूहिक प्रार्थना करणे, प्रवचने घेणे, देवतांना साकडे घालणे आदी उपक्रम देशभर राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव, नंदुरबार, ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) या जिल्ह्यांतही विविध उपक्रम राबवण्यात आले.

१. मंदिरस्वच्छता आणि प्रार्थना !

ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथील महाजन पेठ भागातील विठ्ठल मंदिराची स्वच्छता करतांना धर्मप्रेमी
चोपडा येथील अलकरीवाडा महादेव मंदिराची स्वच्छता करतांना धर्मप्रेमी
ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथील नया मोहल्ला, पंछोष्ठी भागातील दत्त मंदिराची स्वच्छता करतांना धर्मप्रेमी

२९ एप्रिल या दिवशी चोपडा (जळगाव) येथील यावल नाक्यावरील नागदेव मंदिर, २ मे या दिवशी अष्टविनायक मंदिर, अलकरीवाडा महादेव मंदिर यांची, तर ४ मे या दिवशी महादेव मंदिराची, तसेच ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथील नया मोहल्ला, पंछोष्ठी भागातील दत्त मंदिराची आणि महाजन पेठ भागातील विठ्ठल मंदिराची स्वच्छता करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

२. साकडे

नंदुरबार येथील खंडेराव मंदिरात साकडे घालतांना धर्मप्रेमी
पाचोरा (जळगाव) येथील जामनेर रोडवरील श्रीराम मंदिरात साकडे घालतांना धर्मप्रेमी

३० एप्रिल या दिवशी चोपडा येथील आनंदी भवानी मंदिर आणि पाळधी येथील विठ्ठल मंदिर, २ मे या दिवशी गजानन महाराज मंदिर, ४ मे या दिवशी शनि मंदिर आणि मोठा मारुति मंदिर, ५ मे या दिवशी पाचोरा (जळगाव) येथील जामनेर रोडवरील श्रीराम मंदिर, नंदुरबार येथील खंडेराव मंदिर येथे साकडे घालण्यात आले.

३. प्रवचन

ब्रह्मपूरच्या लालबाग परिसरातील गोकुलधाम मंदिरात प्रवचन घेतांना सौ. पिंकी माहेश्‍वरी

२९ एप्रिल या दिवशी ब्रह्मपूरच्या लालबाग परिसरातील गोकुलधाम मंदिरात सौ. पिंकी माहेश्‍वरी यांनी ‘साधना’ या विषयावर प्रवचन घेतले. याच विषयावर ३ मे या दिवशी बँक कॉलनी भागातील शिव मंदिरात सौ. विमल कदवाने यांनी प्रवचन घेतले. ३ मे याच दिवशी नंदुरबार येथील एलिझाबेथनगर भागात ‘साधना’ या विषयावर

नंदुरबार येथील एलिझाबेथनगर येथे  प्रवचन घेतांना सौ. निवेदिता जोशी

सौ. निवेदिता जोशी यांनी आणि ‘उष्माघाताची लक्षणे आणि उपाय’ या विषयावर डॉ. रजनी नटावदकर यांनी प्रवचन घेतले. २ मे या दिवशी लोहियानगर, चोपडा येथे सौ. सुनीता व्यास यांनी ‘साधना’ विषयावर प्रवचन घेतले.

४. शौर्यजागरण शिबिर

पिंप्री येथील ‘युवा शौर्य जागरण शिबिरा’त स्वरक्षण प्रात्यक्षिक सादर करतांना धर्मप्रेमी

पिंप्री (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘युवा शौर्यजागरण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. चांदसणी-कमळगाव येथील स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील युवकांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या सभामंडपात प्रार्थना करून शिबिराला आरंभ झाला.

प्रारंभी समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय आणि कार्य यांची ओळख करून दिली. त्यानंतर ‘स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आणि शौर्यजागरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आज राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात वाढत चालले आहेत. देशावरील बाह्य संकटे आणि देशांतर्गत वाढणार्‍या दंगली ही परिस्थिती पहाता आज प्रत्येकाने स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. हिंदूंचा इतिहास हा पराक्रमाचा आहे. हिंदु धर्मरक्षणासाठी पुरुषांसह स्त्रियांनीही पराक्रम गाजवला आहे. आज पुन्हा एकदा शौर्यजागरणाची वेळ आली आहे; म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून आपण युवकांमध्ये शौर्यजागरण करण्याचा प्रयत्न करत आहोत.’’

या वेळी चांदसणी-कमळगाव येथील श्री. कल्पेश धनगर आणि श्री. अमोल धनगर यांनी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. या उपक्रमाला गावातील २६ युवक उपस्थित होते. शेवटी नियोजनाच्या चर्चेत पिंप्री येथील युवकांनी प्रशिक्षणवर्गाची मागणी केली आणि नियमित व्यायाम करण्याचा निश्‍चय केला.


Multi Language |Offline reading | PDF