काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेटच्या कारवाया चालू

भारतीय उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा

गेल्या ३ दशकांत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होण्याऐवजी त्यात अशा पद्धतीने वाढ होत आहे, हे लोकशाही निरर्थक ठरल्याचेच द्योतक !

नवी देहली – इस्लामिक स्टेटने (आयएस्ने) भारतीय उपखंडामध्ये एक नवा प्रांत स्थापन केल्याचा दावा केला आहे. श्रीलंकेत या संघटनेने केलेल्या आतंकवादी आक्रमणात हे सिद्ध झाले आहे. आता ही आतंकवादी संघटना काश्मीर खोर्‍यासह भारतात पाळेमुळे रोवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी या संघटनेकडून स्थानिक आतंकवाद्यांसमवेत वाटाघाटी चालू आहेत. १० मे या दिवशी काश्मीरमध्ये सुरक्षादलांनी ठार केलेला इशफाक अहमद सोफी हा आतंकवादी इस्लामिक स्टेटशी संबंधित होता, असा दावा या संघटनेने केला आहे.

इस्लामिक स्टेटच्या वतीने एक वक्तव्य प्रसारित करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘विलाय-ए-हिंद’ म्हणजेच भारतीय प्रांताचा उल्लेख करण्यात आला आहे; मात्र त्यात जम्मू-काश्मीरचा उल्लेख करण्यात आलेला नाही. आतंकवादी संघटनेशी संबंधित काही लोकांच्या सुरक्षायंत्रणांनी केलेल्या चौकशीच्या वेळी या संदर्भातील माहिती मिळाली आहे.


Multi Language |Offline reading | PDF