श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी कट्टर वहाबी विचारांचा प्रसार करणार्‍याला अटक

श्रीलंकेत जिहादी आतंकवादी आक्रमणाची एक घटना झाल्यावर श्रीलंका त्याच्या मुळापर्यंत जाऊन आतंकवाद्यांवर कारवाई करत आहे, तर भारतात ३ दशके जिहादी आतंकवादी आक्रमणे होत असतांना आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते निष्क्रीयच राहिले !

कोलंबो – येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या अन्वेषणातून मुसलमानांमध्ये कट्टरतावादी ‘सलाफी’ आणि ‘वहाबी’ इस्लामी विचारांचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असल्याचे उघडकीस आले आहे. बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार मौलाना जहरान हाशिम हा या विचारधारेचा पुरस्कर्ता होता. त्याला पोलिसांनी यापूर्वीच चकमकीत ठार मारले आहे. आता या विचारांचा प्रसार करणार्‍या ६० वर्षीय महंमद अलियर या मुसलमानाला अटक करण्यात आली आहे.

१. महंमद अलियर हा ‘सेंटर फॉर इस्लामिक गाईडेन्स’ नावाच्या संस्थेचा संस्थापक आहे. त्याने श्रीलंकेतील मुसलमानबहुल कट्टनकुड्डी भागामध्ये मशीद बनवली आहे, तसेच धार्मिक शाळा आणि ग्रंथालय चालू केले आहे.

२. अलियर याचे हाशिम याच्याशी घनिष्ठ संबंध होते. तसेच त्यांच्यात आर्थिक व्यवहारही होत होते. हाशिम नेहमी या सेंटरमध्ये जात असे आणि तेथील इस्लामी पुस्तकांचा अभ्यास करत असे. अलियर याचा आत्मघाती बॉम्बस्फोट करणार्‍या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये सहभाग होता.

३. अलियर याने वर्ष १९९० मध्ये या सेंटरची स्थापना केली होती. त्याने सौदी अरबमधील रियाध येथील इमाम महंमद इबिन इस्लामिक युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर या सेंटरची स्थापना केली होती. या सेंटरला सौदी अरब आणि कुवेत येथून देणग्या मिळत होत्या. (मोदी सरकारने भारतात वहाबी विचारांचा प्रसार करणार्‍या संस्थांना मिळणार्‍या विदेशी धनावर बंधने घातली आहेत, तसेच या विचारांचा प्रसार करणार्‍यांवर निर्बंध घालण्याचे काम केले आहे; मात्र काँग्रेसच्या काळात असे झाले नव्हते ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF