अनेक कलागुण अवगत असून सेवेसाठी तत्पर असणारी केरळ येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. देवीनंदना (वय १२ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. देवीनंदना एक आहे !

केरळ येथील बालसाधिका कु. देवीनंदना हिची कोची आश्रमातील साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

कु. देवीनंदना

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

१. साधनेत येण्यापूर्वी हनुमान आवडू लागल्यावर मांसाहार सोडणे, एका महिलेने ‘या जन्मात हवे ते खायचे’, असे सांगितल्यावर ते योग्य वाटून पुन्हा मांसाहार करण्याचा विचार येणे आणि सत्संगात जन्म केवळ ईश्‍वरप्राप्तीसाठीच असल्याचे समजल्यावर मासाहार करण्यास पुन्हा आरंभ न करता साधना करणे

‘कु. देवीनंदनाला साधनेत येण्यापूर्वी (अंदाजे २ वर्षांपूर्वीची गोष्ट) हनुमान आवडायला लागला. तेव्हापासून तिने मांसाहारी भोजन खाणे सोडले. त्यानंतर तिच्या ओळखीच्या एका महिलेनी तिला ते न खाण्याचे कारण विचारले. त्या वेळी कु. देवीनंदनाने तिला कारण सांगितले. तेव्हा त्या महिलेनी सांगितले, ‘आपल्याला एकच जन्म असतो. त्यामुळे त्या जन्मात आपण पुष्कळ मौज-मजा करायची आणि हवे ते खायचे.’ हे ऐकल्यावर कु. देवीनंदनाला ‘तिचे म्हणणे योग्य आहे’, असे वाटले आणि ‘मांसाहार करणे पुन्हा चालू करूया’, असाही विचार तिच्या मनात आला. त्याच सुमारास तिला साधना कळली आणि तिच्या मनावर ‘आपला जन्म केवळ ईश्‍वरप्राप्तीसाठीच आहे’, हे सत्संगात सांगितलेले सूत्र बिंबले. त्यामुळे ‘हा जन्म तेवढ्यापुरताच आहे’, हा निश्‍चय करून तिने मांसाहार करण्यास पुन्हा आरंभ न करता ती साधना करू लागली.

२. अनेक कलागुण असणे

तिच्या अंगी पुष्कळ कला आहेत. ती स्वतःच्या कपड्यांवरही काही चित्रे काढते, रंगवते आणि तसेच ते शिवते. तिने सत्संग घेणार्‍या साधिकेला एक लहान बटवा (purse) शिवून दिला. तिला चित्रकला सुद्धा येते. तिच्यात असे पुष्कळ गुण आहेत.

३. मामाने सांगितल्याप्रमाणे (परेच्छेने) वागणे

ती शास्त्रीय नृत्य शिकत होती आणि भगवद्गीता शिकायलाही जात होती; पण एका परीक्षेत तिला एरव्हीपेक्षा २ टक्के गुण न्यून पडल्यामुळे तिच्या मामाने तिला हे सर्व बंद करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. त्यानंतर आईने तिला सांगितले, ‘तू हे सर्व शिकायला जा. मामा इथे कधीतरीच येतो ना ! तेव्हा तू शिकायला गेलीस, तरी त्याला कळणार नाही.’ (तिचा मामा दुसर्‍या गावी रहातो.) मामाने सांगितलेल्याच्या विरोधात आपण जायला नको; म्हणून ते नृत्य इत्यादी आवडत असूनही तिने ते सध्या सोडले आहे. ‘मामा सांगेल, तेव्हा मी शिकायला पुन्हा चालू करील’, असे तिने सांगितले.

४. स्वतः प्रवचन घेण्याची सिद्धता दर्शवणे

यंदाच्या शिवरात्रीला तिच्या आईला शिवरात्रीसाठीच्या प्रवचनाची एक पटकथा (स्क्रिप्ट) दिली होती. आई प्रवचनाची सिद्धता करीत होती आणि तिला विचारत होती, ‘माझे बरोबर आहे ना ? मी कुठे सुधारू ?’ इत्यादी. तेव्हा ती तिला सुधारणा सांगायची. त्या वेळी देवीनंदनाने स्वतः प्रवचन करण्याची सिद्धता दाखवली.

५. कोणत्याही सेवेसाठी तत्पर असणे

कु. देवीनंदना कुठलीही सेवा करायला सिद्ध असते. तिला ए ३ (A३) आकारातील पोस्टर लावायची सेवा दिली किंवा मंदिरात लावण्यात येणारे धर्मशिक्षण फलक लिहायची सेवा किंवा एखाद्या विषयावर प्रवचन करणे असो किंवा इतरांना साधना सांगायची सेवा असो, ती ते सर्व करायला सिद्ध असते.

६. भावसोहळा पहाण्याची तळमळ असणे

१९.२.२०१९ या दिवशी झालेल्या भावसोहळ्याला ती आणि तिची आई येणार होत्या; पण ऐन वेळी तिच्या आईची प्रकृती बरी नसल्यामुळे आई येऊ शकत नव्हती. त्यामुळे अन्य २ साधिका तिला तिच्या घरून भावसोहळा बघण्याच्या ठिकाणी घेऊन जायला तिच्या घरी गेल्या. तेव्हा ती पुष्कळ आनंदी होऊन त्यांच्या समवेत गेली. तिला भावसोहळा पहाता येणार नाही; म्हणून आधी वाईट वाटत होते. त्यामुळे साधक न्यायला गेल्यावर तिला पुष्कळ आनंद झाला. भावसोहळ्याच्या दरम्यान साधक जेव्हा मधे मधे प्रार्थना करत होते, तेव्हा त्यांना पाहून तीही प्रार्थना करत होती.

७. भावपूर्ण प्रार्थना करून डोळे उघडल्यावर मंदिरातील हवी असलेली व्यक्ती भेटणे

एकदा एका मंदिरातील एका विश्‍वस्तांना भेटायला ती अन्य २ साधिकांसमवेत गेली होती. ‘मंदिराच्या उत्सवाच्या पत्रकामध्ये हिंदु जनजागृती समितीचे धर्मशिक्षणाचे मजकूर छापतील का ?’, यासाठीची अनुमती घ्यायला ते गेले होते. मंदिरात पोेचल्यावर ते विश्‍वस्त तिथे नव्हते. तेव्हा एका साधिकेने सांगितले, ‘आपण प्रार्थना करूया.’ तेव्हा त्यांच्या समवेत कु. देवीनंदनानेसुद्धा पुष्कळ भावपूर्ण प्रार्थना केली आणि डोळे उघडताच त्यांना ती व्यक्ती समोर दिसली. याचे सर्वांना आश्‍चर्य वाटले; कारण ती व्यक्ती सहसा अशी भेटत नाही.’ (मंदिरात येण्याची त्यांची वेळ निश्‍चित नसते.)

– कु. अदिती सुखठणकर, केरळ


Multi Language |Offline reading | PDF