आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा ‘टाईम’ !

संपादकीय

अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘टाइम’ नियतकालिकाने त्यांच्या आशियाच्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र प्रसिद्ध करून ‘मोदी : दुफळी निर्माण करणारा नेता’, असा उल्लेख केला आहे. पाकिस्तानी राजकारणी आणि उद्योगपती यांचा मुलगा असलेले पत्रकार आतिश तासिर यांनी या लेखाद्वारे मोदींवर पुष्कळ टीका केली असून मोदी हिंदुत्वाचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भारतात लोकसभेच्या निवडणुका चालू असतांना आणि मोदींसाठी सकारात्मक वातावरण असतांना हा लेख प्रसिद्ध होणे, म्हणजे हा एक व्यापक आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा भाग म्हणावा लागेल. केवळ काही चुकीच्या धोरणांवर टीका करणे, हे एक वेळ पत्रकारितेचा भाग समजू शकतो; मात्र देशाच्या मूळ सैद्धांतिक मूल्यांची जाण न ठेवता त्या दृष्टीने देशाविषयी बोलणे, चुकीचे समज करून घेऊन भूमिका मांडणे, हे होकायंत्राअभावी समुद्रात दिशा चुकलेल्या जहाजासारखे आहे. त्यामुळे त्याविषयी भाष्य करणे, हे राष्ट्रनिष्ठ पत्रकारांचे कर्तव्य आहे.

पत्रकार आणि कादंबरीकार आतिश तासिर यांची आई आणि पत्रकार तवलीन सिंह या जरी भारतीय असल्या, तरी त्यांचे पिता हे पाकिस्तानी मुसलमान आहेत, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीत हिंदू, हिंदुत्व आणि भारत यांच्या द्वेषाची झालर असणार, हे ओघानेच येते. त्याचप्रमाणे तवलीन सिंह आणि सलमान तासिर हे काही मतभेदानंतर वेगळे झाल्यावर तवलीन सिंह या अजित गुलाबचंद या भारतीय उद्योग जगतातील मोठे प्रस्थ असलेल्या व्यक्तीसमवेत ‘लिव्ह-इन-रिलेशनशीप’मध्ये राहिल्या.  गुलाबचंद यांची शरद पवार यांच्याशी चांगली मैत्री आहे. शरद पवार यांनी पुण्यालगतची १० सहस्र एकर भूमी ‘लवासा’ या त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी संमत करून घेतली होती. या प्रकल्पात गुलाबचंद सहभागी होते. यातून मोदीविरोधातील आणि त्याद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या पंतप्रधानांची अपकीर्ती करण्याचे धागेदोरे कुठपर्यंत जोडले गेलेले असू शकतात, याची कल्पना यावी अन्यथा या व्यक्तीगत माहितीत कोणाला रस असणार !

पत्रकार तासिर यांची बिनबुडाची सूत्रे

आतिश तासिर त्यांच्या लेखात प्रारंभीच ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही मोदी सरकारला पुन्हा संधी देईल का ?’, असा प्रश्‍न विचारून त्यांचा रोख स्पष्ट केला. तासिर पुढे लिहितात, ‘मोदी यांनी भारतातील नेहरूंसारख्या महान नेत्यांवर राजकीय आक्रमणे केली आहेत. ते काँग्रेसमुक्त भारताची भाषा करत आहेत. त्यांनी हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये बंधुभावाची भावना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. गोरक्षणाच्या सूत्रावरून वारंवार मुसलमानांवर आक्रमणे झाली. असा एकही मास गेला नाही की, जमावाने मुसलमानांना मारहाण केल्याची छायाचित्रे लोकांच्या भ्रमणभाषमध्ये प्रसारित झाली नाहीत.’ भारतीय इतिहासाचा विचार केल्यास नेहरू आणि त्यांची काँग्रेस यांनी असे एक तरी क्षेत्र ठेवले आहे का की, ज्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही ? एवढेच काय तर ‘काश्मीरची समस्या देशाला कोणाची देण आहे ?’, असे विचारल्यावर नेहरू यांच्याकडेच बोट जाते, तर ‘देशात भ्रष्टाचाराची परंपरा कोणी चालू केली ?’, या प्रश्‍नावर काँग्रेसचे नाव येते. देशाची गौरवशाली संस्कृती नष्ट आणि भ्रष्ट करण्याचे महापाप ज्यांच्याकडून झाले, त्यांच्यापासून देश मुक्त करण्याची मागणी केल्यास त्यामध्ये चुकीचे काय आहे ?, हे तासिर महाशयांना कोणीतरी समजावून सांगितले पाहिजे.

राहिले सूत्र हिंदु आणि मुसलमान यांच्यातील बंधुभाव वाढवण्याचे. हे सूत्र आतिश तासिर यांनी इस्लामच्या आधारावर भारतातून फुटून पाकिस्तान निर्माण करणार्‍यांना प्रथम विचारायले हवे होते. मुसलमानांनी कसेही वागावे आणि हिंदूंनी त्यांच्याशी बंधुभाव ठेवावा, ही चुकीची शिकवण देशात गांधी यांनी काँग्रेस संस्कृतीचा भाग म्हणून दिली अन् त्याचे दुष्परिणाम हिंदूंनी भयंकर प्रकारे भोगले. काश्मीरमधून असंख्य हिंदु पंडितांचे झालेले शिरकाण, त्यांच्या स्त्रियांवर झालेले बलात्कार आणि त्यांना तेथून पलायन करण्यास भाग पाडले जाणे, देशात मुसलमानबहुल भागांत दंगली उसळून हिंदूंवर अत्याचार होणे आणि त्यांना त्या भागातून पलायन करण्यास भाग पाडणे, लव्ह जिहादच्या माध्यमातून चांगल्या घराण्यातील हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचा उपभोग घेऊन त्यांचे धर्मांतर करणे, त्यांना विकणे, वेश्याव्यवसायात ढकलणे इत्यादी शेकडो घटना पाहिल्या की, सर्वसामान्य माणसांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. तथापि जाणूनबुजून हिंदु-मुसलमान ऐक्याच्या भ्रमात रहाणार्‍या काँग्रेसींची झोप काही उडायची नाही. ‘मोदी यांनी लांगूलचालनाचा भाग काँग्रेसींप्रमाणे करायला हवा होता, तो केला नाही’, हे तासिर यांचे दुखणे आहे. राहिला प्रश्‍न गुजरात दंगलीचा. गोध्रा हत्याकांडांमध्ये ५९ कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले, याचा लेखात एका शब्दानेही उल्लेख करण्याचे सोयीस्करपणे का टाळले जाते ? यातून तासिर यांचा हिंदुद्वेषच प्रकट होतो.

पटलावर ‘व्हिस्की’चे घोट घेत लिखाण करणार्‍या ‘हाय प्रोफाईल’ लेखकांचा गट कार्यरत आहे, असे म्हणतात. ‘व्हिस्की’चे घोट घेतल्यावर आलेल्या धुंदीतून स्वत:ला विश्‍वातील सर्व गोष्टींचे ज्ञान झाल्याच्या आविर्भावात लिखाण करण्यात येते. या लिखाणाला ना शेंडा असतो, ना बुडखा ! या धुंदीतूनच अवास्तव माहिती आणि कल्पना यांचे रसभरीत वर्णन मांडण्यात येते. परिणामी ‘एक्सक्लूसिव्ह’ माहिती देण्याच्या नादात त्या व्यक्तीच्या मेंदूतील कचराच कागदावर उतरतो. तोच प्रकार ही ‘कव्हर स्टोरी’ लिहितांना लेखकाविषयी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या षड्यंत्राच्या ‘टाइम’वर बहिष्कार घालणेच योग्य.


Multi Language |Offline reading | PDF