परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वर्ष २०१९ मधील जन्मोत्सव साजरा करण्याच्या संदर्भात महर्षि मयन यांनी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितलेली सूत्रे !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘सत्यनारायणा’च्या रूपात दर्शन द्यावे !

‘२३.१.२०१९ या दिवशी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन्जी यांनी भ्रमणभाषवरून सांगितले, ‘‘वर्ष २०१९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. मयन महर्षींनी सांगितले आहे, ‘गुरुदेवांना श्रीविष्णूच्या ‘सत्यनारायण’ रूपात पहाण्याचे भाग्य साधकांना लाभणार आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हातात शंख, चक्र आदी घेऊन साधकांना ‘सत्यनारायणा’च्या रूपात दर्शन द्यावे ! यामुळे साधकांना श्रीकृष्णाच्या विश्‍वरूप दर्शनाचे फळ मिळणार आहे.

श्री सत्यनारायणाच्या उजव्या बाजूला उभी असलेली दीपलक्ष्मी !

२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या उजव्या बाजूला सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि डाव्या बाजूला सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दीपलक्ष्मीप्रमाणे हातात दीप घेऊन उभे रहावे !

या वेळी सत्यनारायण स्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या बाजूला सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि डाव्या बाजूला सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी उभे रहावे. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी हिरव्या रंगाची आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसावी, तसेच दीपलक्ष्मीच्या हातात जसे दीप असतात, तसे दीप सद्गुरुद्वयींनी हातात धरावेत.

श्री सत्यनारायणाच्या डाव्या बाजूला उभी असलेली दीपलक्ष्मी !

३. जन्मोत्सवाच्या आधी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नैमिषारण्यात जावे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या आधी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नैमिषारण्य येथे जावे. ऋषी-मुनींनी सत्यनारायणाची कथा प्रथम नैमिषारण्यात सांगितली आणि सत्यनारायणाची पहिली पूजाही नैमिषारण्यातच करण्यात आली.’’ (‘१९.४.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ नैमिषारण्यात गेल्या होत्या. तेथे त्यांनी ‘सत्यनारायण पूजा’ केली. त्याच दिवशी रामनाथी आश्रमात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘सत्यनारायण पूजा’ केली. – संकलक)

४. रामनाथी आश्रमात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘महाराजमातंगी  याग’ करावा !

२७.१.२०१९ या दिवशी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांनी सांगितले, ‘‘६.५.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दिनांकानुसार वाढदिवस आहे. या दिवशी रामनाथी आश्रमात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘महाराजमातंगी याग’ करावा. कनकदुर्गादेवी हे राजमातंगी देवीचे रूप आहे.

५. या वर्षी ६ ते ११.५.२०१९ असा ६ दिवसांचा ‘गुरु जन्मोत्सव सोहळा’ साजरा करावा !

या वर्षी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव वैशाख शुक्ल पक्ष सप्तमी, म्हणजे ११.५.२०१९ या दिवशी साजरा करावा. या वेळी ६ ते ११.५.२०१९ असा ६ दिवसांचा ‘गुरु जन्मोत्सव सोहळा’ साजरा करावा.’’ (‘महर्षींच्या आज्ञेनुसार परात्पर गुरुमाऊलींचा जन्मोत्सव या वर्षी वैशाख शुक्ल पक्ष सप्तमीला साजरा झाला.’ – संकलक)

६. गुरुमाऊली श्री गुरु सत्यनारायणाच्या वेशभूषेत असतांना त्यांना सुवर्णाचे ‘श्रीवत्समुद्रा’ पदक परिधान करण्यास द्यावे !

२१.२.२०१९ या दिवशी मयन महर्षींनी सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी श्री गुरु ‘सत्यनारायणा’च्या वेशभूषेत असतांना त्यांना सुवर्णाचे ‘श्रीवत्समुद्रा’ पदक परिधान करण्यास द्यावे. या पदकाच्या मध्यभागी ‘श्रीमहालक्ष्मी’चे रूप असावे. सद्गुरुद्वयींनी एका तबकात पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या रेशमी वस्त्रांत गुंडाळून सुवर्णाचे ‘श्रीवत्समुद्रा’ पदक श्री गुरूंना द्यावे. सत्यनारायण रूपात असलेल्या श्री गुरूंनी ते पदक धारण करावे.’’ (जन्मोत्सवाच्या भावसोहळ्यात परात्पर गुरुमाऊलींनी ‘श्रीवत्समुद्रा’ पदक धारण केले. – संकलक)                     

संकलन : श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. ३०.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF