भिवंडीतील श्री वज्रेश्‍वरीदेवीच्या मंदिरावर दरोडा !

भाजपच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

ठाणे – जिल्ह्यातील भिवंडी येथील आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वज्रेश्‍वरीदेवी मंदिरात १० मे या दिवशी पहाटेच्या वेळी १० ते १२ दरोडेखोरांनी मंदिरातील सुरक्षारक्षकांना बांधून ठेवले, तसेच मारहाण केली आणि दानपेट्या फोडून त्यातील रक्कम घेऊन पोबारा केला. या वेळी चोरांनी ७ लाखांची रक्कम पळवून नेली. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. मंदिरातून किती साहित्य चोरीला गेले, हे अद्याप समजू शकलेले नाही. मंदिरावरील दरोड्याच्या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी बंद पाळला आहे.


Multi Language |Offline reading | PDF