श्री महाराजमातंगी याग आणि कुंकूमार्चन यांच्या वेळी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात मयन महर्षी यांनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून केलेल्या आज्ञेनुसार ६.५.२०१९ या दिवशी सनातनच्या आश्रमात महाराजमातंगी याग करण्यात आला. यागाच्या वेळी, तसेच सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या देवीला कुंकूमार्चन करतांना घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी, झालेले त्रास येथे देत आहोत.

श्री राजमातंगीदेवी

१. सद्गुरुद्वयी षोडशोपचाराच्या अंतर्गत कुंकूमार्चन करण्यासाठी यज्ञस्थळी उपस्थित झाल्यावर देवीच्या मूर्तीच्या तोंडवळ्यावर स्मित हास्य जाणवत होते. (छायचित्र क्रमांक १ पहा.)

१. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ कुंकूमार्चन करण्यासाठी यज्ञस्थळी आल्यावर देवीच्या मूर्तीच्या तोंडवळ्यावर दिसलेले स्मित हास्य ! (गोलात मोठे करून दाखवले आहे.) २. कुंकूमार्चनानंतर देवीच्या मस्तकावर वाहिलेल्या कुंकवामध्ये निर्माण झालेला देवीचा उर्ध्व दिशेकडे पहाणारा तोंडवळा (गोलात मोठे करून दाखवले आहे.)

२. सद्गुरुद्वयी कुंकूमार्चन करत असतांना ‘देवीने कुंकवाचा पदर आणि बिंदी धारण केली आहे’, असे स्वरूप निर्माण झाले होते. यासमवेत सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी देवीच्या मस्तकावर, तर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी देवीच्या चरणांवर वाहिलेल्या कुंकवामध्ये श्रीयंत्राचा आकार निर्माण झाला होता.

३. कुंकूमार्चन झाल्यावर देवीच्या आशीर्वादाचा हात आणि डोळे सोडून उर्वरित पूर्ण अंग कुंकवाने झाकले गेले. यावरून ‘देवीचा आशीर्वाद आणि तिची कृपाळू दृष्टी साधकांवर सदैव आहे’, हे लक्षात आले.

४. कुंकूमार्चनच्या वेळी देवीच्या मस्तकावर वाहिलेल्या कुंकवामध्ये देवीचा उर्ध्व दिशेकडे पहाणारा तोंडवळा निर्माण झाला होता. (छायचित्र क्रमांक २ पहा.)

५. यागाच्या वेळी उपस्थित असलेल्या २ पोपटांपैकी एका पोपटाचे ध्यान लागल्याचे लक्षात आले. ‘ध्यानयोग वायूतत्त्वाशी संबंधित असून देवीही वायूतत्त्वाशी संबंधित असल्याने पोपटाचे ध्यान लागले. यागाच्या वेळी उपस्थित असलेला दुसरा पोपट पुष्कळ आवाज करत होता. देवीकडून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुणतत्त्वामुळे पहिल्या पोपटाचे ध्यान लागत होते, तर दुसरा पोपट देवीचे सगुणतत्त्व ग्रहण करत असल्याने तो आवाज करत होता. यावरून यागाच्या वेळी देवीची सगुण आणि निर्गुण दोन्ही तत्त्वे कार्यरत असल्याचे लक्षात आले.

६. हवन चालू असतांना आश्रम परिसरातील औदुंबराच्या वृक्षावर एक पक्षी गोड आवाज करत होता. श्री राजमातंगीदेवी सर्व प्राणीमात्रांना आकर्षित करणारी देवी आहे. पक्ष्याच्या गाण्यातून श्री राजमातंगीदेवीच्या शक्तीची प्रचीती साधकांना आली.

७. यज्ञकुंडातील अग्नीज्वाळांमध्ये देवतांच्या आकृत्या दिसत होत्या.

यज्ञकुंडातील ज्वाळांमध्ये दिसत असलेले वाईट शक्तींचे तोंडवळे (गोलात दाखवले आहेत.)

८. पूर्णाहुतीच्या वेळी देवीच्या कृपेने मिळत असलेल्या दैवी संकेतांविषयीची माहिती सांगत असतांना श्री. निषाद देशमुख यांच्या कपाळावर त्रिपुंड्राच्या (कपाळी लावायच्या तीन पट्ट्यांच्या तिलकाच्या) आकाराचा घाम आला होता.

९. पूर्णाहुतीनंतर पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांच्या छातीवर लालसर रंगाची छटा निर्माण झाली. ‘अनाहतचक्रातून शक्ती बाहेर पडल्याने अशी लालसर छटा निर्माण झाली’, असे सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांनी या वेळी सांगितले.

१०. पूर्णाहुतीच्या वेळी ‘यज्ञस्थानाजवळील घुमटीतील हनुमंत यज्ञकुंडाकडे पहात आहे आणि त्याचे नेत्र सजीव झाले आहेत’, असे सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांना जाणवले. यासोबत पूर्णाहुती होतांना हनुमंताच्या गळ्याची माळा तिरपी झाल्याचे आणि त्याच्या चरणांवर वाहिलेले फूलही सद्गुरूंच्या दिशेने वळल्याचे लक्षात आले. त्या वेळी हनुमंताच्या मूर्तीच्या ठिकाणी लालसर रंगाचा प्रकाश पडला होता.

११. पूर्णाहुती होत असतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तोंडवळ्यावर आनंद आणि स्मितहास्य, तर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या तोंडवळ्यावर भाव जाणवत होता. त्यामुळे त्यांचे तोंडवळे अधिक तेजस्वी झाल्याचे जाणवत होते.


Multi Language |Offline reading | PDF