भारतीय सैन्यात प्रथमच ख्रिस्ती धर्मगुरूंची नेमणूक

ख्रिस्ती पाद्रयांचा धर्मांतराचा इतिहास पहाता, त्यांनी सैन्यातही असा उपद्रव केल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

मलबार चर्चचे फादर जीस जोस किझाक्केल

कोची (केरळ) – कोठमंगलम् येथील सायरो-मलबार चर्चचे फादर जीस जोस किझाक्केल यांना भारतीय सैन्यात नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) या पदावर नियुक्त करण्यात आले. भारतीय सैन्यात भरती झालेले ते पहिलेच ख्रिस्ती धर्मगुरु आहेत.

ते सैन्यातील धार्मिक कार्ये आणि उत्सव यांचे त्यांच्या संबंधित युनिटमध्ये आयोजनही करणार आहेत.

भारतीय सैन्यात धार्मिक शिक्षकांच्या भरतीचे उद्दीष्ट युनिटमधील धार्मिक आणि प्रादेशिक सद्भावनासह राष्ट्रीय एकता निश्चित करणे आहे. ही एक अत्यंत कठीण भूमिका आहे. सैनिकांना आध्यात्मिक सल्ला देणे, त्यांच्या वैयक्तिक वेदना आणि संकटे समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करणे, सीमा भागातील सैनिकी रुग्णालयात भरती झालेल्या घायाळांना आणि इतर रुग्णांना भेट देणे, त्यांचे सांत्वन करणे, सल्ला देणे ही कामे ‘धार्मिक शिक्षका’च्या कर्तव्यात मोडतात, असे फादर किझाक्केल यांनी सांगितले. (इतर रुग्णांना ‘भेटी’ देण्याच्या नावाखाली ख्रिस्ती धर्मगुरु त्यांचे धर्मांतर करणार नाहीत कशावरून ? ख्रिस्ती पाद्रयांचा इतिहास तरी हेच सांगतो ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF