राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी साध्वी प्रज्ञासिंहांसारख्या साधूसंतांची संसदेत आवश्यकता ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या प्रचारासाठी कीर्तनकार भोपाळमध्ये

पुणे, ९ मे (वार्ता.) – राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासारख्या धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी उमेदवारांचा विजय होणे आवश्यक आहे. राजकारण हा धर्मकारणाचा भाग आहे. त्यामुळे साधूसंतांनी निवडणूक लढवणे काही अयोग्य नाही. साधूसंतांचा निवडणुकीतील विजय हा हिंदु राष्ट्र साकार होण्याच्या दृष्टीनेचे पहिले पाऊल असेल, असे मत हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांनी व्यक्त केले. साध्वी प्रज्ञासिंह यांचा प्रचार करण्यासाठी ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांच्यासह ८-१० कीर्तनकार भोपाळमध्ये गेले आहेत. कोपरा बैठका, घरोघरी प्रसार आदी माध्यमांतून साध्वी प्रज्ञासिंह यांचा प्रचार चालला असून लोकांमध्येही उत्साह आहे, असे त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात काँग्रेसचे दिग्विजय सिंह हे त्यांच्यासह साधूसंत असल्याचा दावा करत असले, तरी त्यात तथ्य नाही. त्यांच्यासह असलेले अनेक जण पाखंडी आहेत. त्यांनीच हिंदु आतंकवादाचे षड्यंत्र रचले. सहानुभूती मिळवण्यासाठी अथवा प्रायश्‍चित्त म्हणून ते यज्ञयाग करत असले, तरी हिंदु समाज अशांचा निवडणुकीत पराभव करून हिंदु समाजाला न्याय मिळवून देऊ इच्छित आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात स्वरा भास्करसारख्या महिला अश्‍लाघ्य भाषेत टीका करत आहेत; पण ज्यांना स्वतःच्या लज्जेचेही भान नाही, त्यांना साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. अशा चरित्रहीन लोकांनी ढवळाढवळ न केलेलीच चांगली ! साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविषयी महिला वर्गामध्ये आकर्षण असून त्यांचा विजय निश्‍चित आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF