तंबाखू उत्पादनांचे विज्ञापने करू नका ! – कर्करोगग्रस्त व्यक्तीचे अभिनेता अजय देवगण यांना आवाहन

अजय देवगण यांची विज्ञापने पाहून तंबाखूचे सेवन केल्याने कर्करोग

तंबाखूच्या उत्पादनांचे सेवन केल्याने कर्करोग होतो, हे स्पष्ट असतांना सरकार अशा उत्पादनांवर कायमस्वरूपी बंदी का घालत नाही ? तसेच यांच्या विज्ञापनांवर बंदी का घालण्यात आली नाही ?

जयपूर (राजस्थान) – येथील नानकराम मीणा या कर्करोगग्रस्त व्यक्तीने समाजाच्या कल्याणासाठी तंबाखू उत्पादनाचे विज्ञापन करू नये, असे आवाहन अभिनेता अजय देवगण यांना केले आहे. तसेच या संदर्भात सांगानेर, जगतपुरा आणि इतर जवळपासच्या परिसरामध्ये एक सहस्र पत्रके वाटली आणि भिंतींवर लावली आहेत. यामध्ये तंबाखूचे सेवन केल्याने त्याचे होणारे परिणाम आणि त्याच्यामुळे कुटुंबावर ओढावलेली स्थिती याविषयीची माहिती देण्यात आली आहे. नानकराम हे अजय देवगण यांचे पुष्कळ मोठे चाहते असून त्यांनी तंबाखू उत्पादनाचे विज्ञापन केल्याचे पाहूनच नानकरामनेही या उत्पादनांचे सेवन चालू केले. परिणामी त्यांना कर्करोग झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF