पाकिस्तानी तरुणींशी बनावट विवाह करून त्यांना चीनमध्ये नेऊन वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणार्‍या चिनी नागरिकांना अटक

या घटनेतून असे स्पष्ट होते की, पाक आता पूर्णपणे चीनच्या कह्यात गेला आहे !

इस्लामाबाद – पाकिस्तानी तरुणींशी बनावट विवाह करून नंतर त्यांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडण्यात येणार्‍या एका टोळीचा शोध लागला आहे. या तरुणींशी विवाह करून त्यांना खोटे सांगून चीनमध्ये नेण्यात येत होते आणि तेथे त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेण्यात येत होता. या प्रकरणी १३ चिनी नागरिकांसह १७ जणांना अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे चीनमध्ये नेण्यात आलेल्या पाकिस्तानी मुलींची संख्या शेकडो असू शकते, असे पाकच्या अन्वेषण यंत्रणेच्या प्रमुखांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF