‘चौकीदार चोर आहे’ म्हटल्याच्या प्रकरणी राहुल गांधी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात विनाअट क्षमायाचना

नवी देहली – ‘चौकीदार चोर आहे’ या घोषणेच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल चुकीच्या पद्धतीने सांगितल्यामुळे न्यायालयाने खडसावल्यानंतर राहुल गांधी यांनी ८ मे या दिवशी न्यायालयाची विनाअट क्षमा मागितली. त्यामुळे आता या वादावर पडदा पडला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या राफेल प्रकरणाविषयी फेरविचार करण्याच्या निर्णयावर निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना ‘न्यायालयानेही ‘चौकीदार चोर आहे’, असे म्हटले आहे’, असे सांगितले होते. त्यावरून राहुल गांधी यांच्याविरोधात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. तेव्हा दोन वेळा राहुल गांधी यांनी खेद व्यक्त केला होता. तेव्हा न्यायालयाने त्यांना फटकारले होते, त्यामुळे अखेर त्यांनी क्षमायाचना केली.


Multi Language |Offline reading | PDF