ऑनलाइन विक्री होणार्‍या ‘किताब द नोबल कुराण’वर बंदी घालण्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका

पुस्तकातून धार्मिक विद्वेष निर्माण होण्याची शक्यता

अशी मागणी का करावी लागते ? सरकारी यंत्रणांच्या हे लक्षात येत नाही का ? गुप्तचरांचे अशा पुस्तकांवर लक्ष नसते का ?

गुरुग्राम (हरियाणा) – सुरजीत सिंह यांनी दारुसलामचे प्रकाशन असणार्‍या ‘किताब द नोबल कुराण’ या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. ‘या पुस्तकाची ऑनलाइन विक्री केली जात आहे. या पुस्तकामध्ये कुराणातील सूरा आणि आयत यांना चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आले आहे. अशामुळे लोकांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो’, असे या याचिकेत म्हटले आहे. यावर न्यायालयाने हे सूत्र योग्य यंत्रणेकडे मांडण्याचा आदेश दिला.


Multi Language |Offline reading | PDF